कोपरगाव येथे ‘आदर्श माता’ पुरस्काराने महिला सन्मानित
Women honored with ‘Adarsh Mata’ award at Kopargaon
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन! Fir 8 Mar 2022,15 :00Pm.
कोपरगाव : कोपरगाव ज्येष्ठ नागरिक सेवा मंच, ज्येष्ठ महिला समिती, साईगाव पालखी सोहळा व मुंबादेवी तरुण मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी पुष्पाताई काळे, श्रीमती सिंधूताई कोल्हे, श्रीमती कमलाबाई ठोळे, मुरुमकरताई व चंदाताई लुणावत यांना नुकताच ‘आदर्श माता’ पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे.
यावेळी कोरोना काळात व समाजासाठी योगदान देणाऱ्या सुतारताई, संगीता मालकर, पुष्पाताई मुंदडा, चंदाताई कोठारी, प्रिती बंब यांचाही याप्रसंगी गौरव करण्यात आला.
सौ. सुधा ठोळे, उतमभाई शहा, सौ. शैलजा रोहोम, सौ. रजनी गुजराथी, विवेकानंद महाराज, सौ. उद्योजक कैलास ठोळे, विजय बंब, कांतीशेठ अग्रवाल, अरविंद भन्साळी, अजित लोहाडे, फुलचंद पांडे, दिलीप अजमेरे, डॉ मुरुमकर, डॉ विलास आचारी, योगेश जोबनपुत्रा, सी. ए. भंडारी, सुहासिनी कोयटे, स्वाती मुळे, वंदना चिकटे, शोभादेवी ठोळे, विमला ठोळे आदींसह कोपरगाव ज्येष्ठ नागरिक सेवा मंच, ज्येष्ठ महिला समिती, साईगाव पालखी सोहळा व मुंबादेवी तरुण मित्र मंडळाचे सदस्य व नागरिक उपस्थित होते. फोटो ओळ – ‘आदर्श माता’ पुरस्कार देवून सन्मानित करतांना पदाधिकारी व सदस्य.