कोपरगावच्या ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी ५ कोटी मंजूर – ना.आशुतोष काळे
5 crore sanctioned for roads in rural areas of Kopargaon – Na. Ashutosh Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन! Fir 8 Mar 2022,18 :00Pm.
कोपरगाव : महाविकास आघाडी सरकारने कोपरगाव मतदार संघाच्या ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी ५ कोटी निधी मंजूर केला असल्याची माहिती श्री.साई संस्थान अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव मतदार संघाचा विकास साधण्यासाठी अडीच वर्षात रस्त्यांसाठी १४० कोटी रुपये निधी मिळविला आहे नंतरच्या पाठपुराव्यातून महाविकास आघाडी सरकारने पुन्हा एकदा ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी ५ कोटी निधी दिला असून आजपर्यंत १४५ कोटी निधी रस्त्यांसाठी मिळाला आहे.
मंजूर झालेल्या पाच कोटी च्या निधीत ग्रामीण भागातील कारवाडी वडाची वाडी भास्करराव गायके वस्ती ते मारुती मंदिर,संदीप भोसले घर ते नानासाहेब तनपुरे वस्ती,मंजूर रा.मा.७ ते हंडेवाडी दादासाहेब गावंड वस्ती,नारायण गावंड वस्ती ते दादासाहेब मोरे वस्ती,दौलत मोरे वस्ती ते विठ्ठलराव तिरसे वस्ती,मारुती मंदिर ते एकनाथ तिरसे वस्ती,माहेगाव देशमुख चारी नं.६ ज्ञानेश्वर खैरनार वस्ती ते सुनील जाधव वस्ती,चारी नं.५ कदम वस्ती (शासकीय विहीर) ते कोळपेवाडी शिव, चारी नं.५ ग्रा.मा.३० ते कुंभारी शिव गोकुळ घुले घर,चांदगव्हाण ईजीमा १६० शिवाजी बाचकर वस्ती ते सुहास शिंदे शेत, कुंभारी प्रजिमा ८५ डॉ.कोपरे ते विजय कारभारी कदम घर,डाऊच बु.मच्छिंद्र दहे घर (चौफुली) होन वस्ती ते अर्जुन दहे घर,मढी बु.रा.मा.७ गवळी वस्ती ते ग्रा.मा.चारी नं.७,कोळपेवाडी माहेगाव शिव चारी नं.५ ते इजिमा १ पर्यंत शिव रस्ता, कोळपेवाडी माहेगाव शिव चारी नं.५ ते चारी नं.६ शिव रस्ता,धोत्रे शिवाजी आगवन शेत ते दत्तात्रय जामदार शेत,भोजडे शिवनाथ दिघे घर ते विक्रम सिनगर घर, कोकमठाण पुणतांबा रोड ते रमेश वाघ घर, वारी देवी मंदिर आदीसह अनेक रस्त्यांचा समावेश आहे.
५ कोटी निधी मंजूर करण्यात आल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांचे ना.आशुतोष काळे यांनी आभार मानले आहे.





