शेतकरी वीज कंपनीच्या विरोधात ग्राहक मंचाकडे तक्रार करणार – सरोदे.

शेतकरी वीज कंपनीच्या विरोधात ग्राहक मंचाकडे तक्रार करणार – सरोदे.

Farmers will lodge a complaint against the power company to the consumer forum – Sarode.

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन! Fir 8 Mar 2022,18 :20Pm.

कोपरगांव : वीज वितरण कंपनीच्या बेशिस्त कारभारामुळे तालुक्याच्या पुर्व भागातील शेतक-यांचे रब्बी हंगामात प्रचंड नुकसान झाल्याने भरपाई मिळावी यासाठी वीज कंपनीच्या विरोधात ग्राहक मंचाकडे तक्रार करणार असल्याची माहिती त्र्यंबकराव सरोदे यांनी दिली. यात दहेगांव बोलका, गोधेगांव, शिरसगांव, सावळगांव, तिळवणी आपेगांव आदि भागातील शेतकरी समावेश आहे.

त्याविषयी बोलताना सरोदे म्हणाले गेल्या दोन वर्षापासून पाउस चांगला पडत असल्याने खरिपाची पिके चांगली आली परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे कशीबशी पिके हातातली ही भरपाई रब्बी रब्बी पिकात मिळेल या आशेवर शेतकरी होता मात्र वीज कंपनीच्या हलगर्जीपणामुळे वसुलीच्या नावाखाली अनेक ठिकाणी रोहित्र बंद केल्यामुळे ज्यांनी वीज बिले भरली त्यांना या त्रासाला सामोरे जावे लागले. वितरण कंपनीकडे वारंवार तक्रार करूनही त्यांनी याची दखल घेतली नाही. दहेगाव बोलका, गोधेगांव, शिरसगांव, सावळगांव, तिळवणी, आपेगांव आदि भागातील शेतकरी या झालेल्या नुकसानीविरूध्द वीज वितरण कंपनीच्या विरोधात ग्राहक मंचाकडे तकार दाखल होणार आहेत असे सरोदे यांनी सांगितले.

Leave a Reply

You cannot copy content of this page