पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहुन जाणारे पाणी पुर्वेकडे वळवावे- स्नेहलता कोल्हे.
The waters of the Western Hemisphere flowing into the sea should be diverted to the east – Snehalta Kolhe.
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन! Sat 9 Mar 2022, 16 :00Pm.
कोपरगांव : उर्ध्व गोदावरी खो-यातील नाशिक नगरसह मराठवाडयातील दीर्घकालीन शेती योजना, औद्योगिक प्रकल्प, तसेच पिण्याचे पाणी यांचे सुयोग्य नियोजन होऊन कायमस्वरूपी हा प्रश्न सुटावा या साठी पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहुन जाणारे पाणी पुर्वेकडे वळवावे अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनाच्या प्रती त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, जलसंपदा राज्यमंत्री बच्चु कडु, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनाही दिल्या आहेत. सौ स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, सहयाद्री माथ्यावर प्रस्तावीत ३० वळण बंधा-यापैकी जे अपूर्ण आहेत ते तातडीने पूर्ण केल्यास अंदाजे ७.५० टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकते. तसेच वैतरणा सॅंडल गेट,नारपार- गोदावरी, दमणगंगा-वैतरणा गोदावरी, दमणगंगा एकदरे-व दमणगंगा पिंजाळ या प्रस्तावित प्रकल्पाची कार्यवाही झाल्यास २५ टी. एम. सी. पाणी उपलब्ध होऊ शकते. माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी समुद्राला वाहुन जाणारे पाणी पुर्वेकडे वळवावे म्हणून सातत्याने पाठपुरावा करून सन २००० मध्ये विधीमंडळात याबाबत मंजुरी घेतली होती,तसेच मीही माझ्या विधानसभा कार्यकाळात या संदर्भात पाठपुरावा केलेला आहे. या प्रश्नाची तीव्रता स्व.शंकरराव कोल्हे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना शिर्डी भेटीत लक्षात आणून दिली होती. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवतराव कराठ यांनी दिनांक ६ सप्टेंबर २०२१ रोजी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबादचे कार्यकारी संचालक यांचे दालनात आढावा बैठक घेवून त्याबाबत मार्गदर्शक सूचनाही केलेल्या आहेत. दुस-या जलसिंचन आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष, जलतज्ञ डॉ. माधवराव चितळे यांनी पश्चिमेकडील नद्यांचे अतिरिक्त पाणी पुर्वेकडे गोदावरी खो-यात वळवून हा ज्वलंत प्रश्न कायमस्वरूपी सुटू शकतो अशी शिफारस महाराष्ट्र शासनास केलेली आहे.तेंव्हा तातडीने कार्यवाही होण्यासाठी संबंधितांना आदेश व्हावेत असेही सौ. स्नेहलता कोल्हे शेवटी म्हणाल्या