शरद पवार यांच्या घरावरील हल्ला; महाराष्ट्राच्या संस्कृतीला अशोभनीय – ना. आशुतोष काळे
Attack on Sharad Pawar’s house; Indecent to the culture of Maharashtra – no. Ashutosh Kale
मुख्य सूत्रधारावर कडक कारवाई करा Take stern action against the mastermind
Rajendara Salkar|वृत्तवेध ऑनलाईन! Sat 9 Mar 2022,16 :50Pm.
कोपरगाव: देशाचे व राज्याचे नेते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानावर एस.टी. कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलेली दगडफेक महाराष्ट्राच्या संस्कृतीला अशोभणीय असुन आम्ही याचा निषेध करतो असे श्री साई संस्थान अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे. शनिवार (दि.९)रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कोपरगाव शहरातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ ना. आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करून या हल्ल्याच्या मुख्य सूत्रधारावर कडक कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन तहसीलदार विजय बोरुडे यांना देण्यात आले.
ना. काळे म्हणाले की,आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे परंतु शरद पवार यांच्या घरावर करण्यात आलेली दगड फेक अशा प्रकारचे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाला अभिप्रेत नाही.२०१९ ला राज्यात महाविकास आघाडीचे सरकार शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झाले.त्यावेळी विरोधी पक्षाला हे सरकार जास्त दिवस सत्तेत राहू शकत नाही अशी त्यांची भावना होती परंतु सरकार पाडण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न होऊन देखील सरकार पडण्याऐवजी मजबूत होत आहे. त्यामुळे या सरकारला बदनाम करण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. हल्ला झाल्यांनतर विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून सर्वप्रथम सोशल मिडीयावर प्रतिक्रिया आल्या यावरून त्यांना या हल्ल्याबद्दल पूर्व कल्पना होती का? असा संशय निर्माण होत असून या हल्ल्यामागे असणाऱ्या मुख्य सूत्रधाराचा शोध घेवून कडक कायदेशीर कारवाई करावी जेणेकरून भविष्यात कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याच्या बाबतीत असे कृत्य घडणार नाही. कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस कडून अशा भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध .
यावेळी काका कोयटे, राष्ट्रवादी संदीप वर्पे, माधवराव खिलारी, सुनील गंगूले, चारुदत्त सिनगर, नवाज कुरेशी, आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.