समता इंटरनॅशनल : मॅथ ऑलिम्पियाड परीक्षेत प्रथम क्रमांकासह २५ सुवर्ण पदकांची कमाई-सौ.स्वाती कोयटे
Samata International: Earned 25 gold medals including first place in Math Olympiad examination – Mrs. Swati Koyte
Rajendara Salkar| वृत्तवेध ऑनलाईन! Mon 11 Apr 2022,
18 :18Pm.
कोपरगाव : एस.ओ. एफ द्वारा आयोजित इंटरनॅशनल मॅथ ऑलिम्पियाड (आय.एम.ओ.) परीक्षेच्या आंतरराष्ट्रीय गुणतालिकेत पहिल्या पाच विद्यार्थ्यांमध्ये प्रथम, व्दितीय आणि चतुर्थ क्रमांकासह २५ सुवर्ण पदकांची कमाई करत यश संपादन केले असल्याची माहिती समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ स्वाती संदीप कोयटे यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय गुणतालिकेत प्रथम क्रमांक निभीष सरवार,द्वितीय क्रमांक इप्सिता राय आणि चतुर्थ क्रमांक केशमा खुराणा यांनी मिळवत सुवर्णपदके मिळविली तर मल्हार जपे,ईश्वरी महाजन,जनिशा डमरे यांनी विशेष प्रविण्यासह सुवर्ण पदके मिळविली तर कौस्तुभ शेळके,नमन सुराणा, सर्वदा सिन्हा,भूमी रोकडे, ओजस तांबे,स्वरा ठोकळ, आदिश आचार्य,अनवी बागडे,सृष्टी वक्ते,रुद्र राठोड,समर्थ हजारे,आर्यन सिन्हा, वेदांत परदेशी,राजेश्वरी तांबे,दर्शिल अजमेरा,मनस्वी आढाव,रोहन दहिया, वृष्टी कोठारी,अथर्व बेरगळ आदी विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकांची कमाई केली.
यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना गणित विभाग प्रमुख आकाश मिश्रा, सहशिक्षक हर्षद निबे,सौ.कविता पाटील,सौ.जलीस शाद,सौ प्रियंका चरपे,स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख अनिस शेख यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे समता स्कूलचे संस्थापक काका कोयटे, मॅनेजिंग ट्रस्टी सौ स्वाती कोयटे, मुख्य कार्यवाह संदीप कोयटे,शैक्षणिक संचालिका सौ.लिसा बर्धन,उपप्राचार्य समीर अत्तार,पर्यवेक्षिका सौ. सारिका अग्रवाल,शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले.