पतीला वाचविताना पत्नीचा विहीरीत बुडून मृत्यू, बहीण वाचली

कोकणठाण रेलवाडी येथील दुर्घटना..

कोपरगाव :
रागाच्या भरात विहिरीत उडी मारलेल्या पतीला वाचविण्यास गेलेल्या पत्नीचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण रेलवाडी येथे घडली. त्यांच्यापाठोपाठ पळत गेलेली बहिणी तोल जाऊन विहिरीत पडली मात्र ती तिला वाचविण्यात गावकऱ्यांना यश आले

या बाबत सविस्तर माहिती अशी की, कोकणठाण रेलवाडी येथे शनिवारी 27 जून रोजी रात्री दहा वाजता किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून पतीने विहिरीत उडी मारून जीव दिला तर त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या पत्नीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला ज्ञानेश्वर तुकाराम खोतकर (वय-३०) पत्नी सविता खोतकर (वय-२५) असे मृतांचे नाव आहे त्यांच्या मागोमाग पळत गेलेली बहीण जनाबाई खोतकर ही तोल जाऊन विहिरीत पडली परंतु ग्रामस्थांना तिला वाचविण्यात यश आले आहे.

रेलवाडी या ठिकाणी मयत ज्ञानेश्वर खोतकर हा मजुरी करून आई-वडील पत्नी दोन वर्षाची मुलगी व परित्यक्त्या बहीण, असे सहा जणांच्या असा परिवारासोबत राहत होता.वडील शेळी पालन करून या कुटुंबांचा उदरनिर्वाह करीत होते .मयत ज्ञानेश्वर यांचे चार वर्षापूर्वी सविता यांचे बरोबर लग्न झाले होते त्यांना दोन वर्षाची एक मुलगी आहे मयत ज्ञानेश्वर खोतकर याच्या पोटात शनिवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास दुखू लागल्याने त्याने आपल्या पत्नीसह कोपरगाव येथील खाजगी दवाखान्यात जाऊन उपचार घेतला असल्याचे समजते त्यानंतर रात्री दहा वाजता त्याने विहिरीत उडी मारून जीव दिला त्याला वाचण्यात गेलेल्या पत्नीचाही बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दोन्ही मयत पती पत्नी यांचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर रविवारी 28 जून रोजी दुपारी शोकाकुल वातावरणात मयत खोतकर पती-पत्नी यांच्यावर रेलवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले या बाबतची खबर मयताचे पिता तुकाराम कचरू खोतकर (वय-६०) कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिली असून या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसानी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू र. नं.२४/२०२० सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भारत नागरे हे करीत आहेत.

Leave a Reply

You cannot copy content of this page