कोपरगाव बसस्थानकातील व्यापारी संकुलाचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश- ना. काळे
Order to prepare proposal for commercial complex at Kopargaon bus stand- no.Kale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Thu14 Apr 2022,19 :20Pm.
कोपरगाव: कोपरगाव बसस्थानकात व्यापारी संकुलासाठी निधी द्या, या मागणीवर व्यापारी संकुल उभारण्याचे प्रस्ताव तयार करण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले आहे अशी माहिती साई संस्थान अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
कोपरगाव येथील दौर्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहिर सभेत संगमनेर बसस्थानकाच्या धर्तीवर कोपरगाव बसस्थानकात देखील व्यापारी संकुल उभारण्यासाठी निधी मिळावा ही मागणी केली होती.यावर शब्द पाळणारा नेता म्हणून ख्याती असलेल्या अजित पवार यांनी आठवड्याच्या आत आश्वासन पूर्तीसाठी मुंबई येथे परिवहनमंत्री ना.अनिल परब व परिवहन राज्यमंत्री ना. सतेज पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेतली.
या बैठकीत बसस्थानक परिसरात असलेल्या रिकाम्या जागेत बसतील एवढे व्यापारी संकुल उभारण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी ना. आशुतोष काळेंना दिली. त्यामुळे कोपरगाव बसस्थानक परिसर लवकरच विकसित होणार आहे.
त्याबद्दल ना.आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहनमंत्री ना.अनिल परब व परिवहन राज्यमंत्री ना. सतेज पाटील, पर्यावरण राज्यमंत्री ना. संजय बनसोडे आभार मानले आहे.
यावेळी या बैठकीसाठी पर्यावरण राज्यमंत्री ना. संजय बनसोडे, ना.आशुतोष काळे, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक, परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितिन गद्रे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, नगर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, लातूरचे जिल्हाधिकारी बी.पी. पृथ्वीराज आदी उपस्थित होते.