गोडावून फोडून धान्य चोरून नेले, दोन लाखाचा मुद्देमाल जप्त

गोडावून फोडून धान्य चोरून नेले, दोन लाखाचा मुद्देमाल जप्त

They stole grain from Godavan and confiscated two lakh items

 २४ तासात आरोपींना अटक, दोन दिवसाची पोलिस कोठडी Accused arrested in 24 hours, two days police custody

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Sun 17 Apr 2022,18 :00Pm.

कोपरगाव : गोडावून फोडून दोन लाखाचे धान्य चोरून नेले,  गुन्हा दाखल झाल्यानंतर  तालुका पोलिसांनी अवघ्या २४ तासात ३ आरोपी अटक केली असून त्यांच्याकडून दोन लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे अटक केलेल्या आरोपींना न्यायालयाने  दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली असून यात एक  आरोपी अल्पवयीन  आहे. अशी माहिती ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, तालुक्यातील चासनळी येथे रात्रीच्या वेळेस  अज्ञात चोरट्यांनी निलेश ताराचंद ब्राह्मणे यांचे गोडावून च्या पत्र्याचे स्क्रू ढिले करून पत्रा वाकून आत प्रवेश करून  गोडाऊन मधील १३०० किलो गहू  व  १०० किलो सोयाबीन असा २ लाख ६ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला याबाबत फिर्यादी निलेश ताराचंद्र ब्राह्मणे यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन मध्ये  चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मुद्देमालाचा व आरोपीचा गोपनिय बातमीदार मार्फत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला  सदर चोरट्यांना पोलिसांनी अवघ्या चोवीस तासाच्या आत सापळा रचून पकडले आहे त्यात आरोपी अविनाश मच्छिंद्र कांबळे (वय वर्ष २९) रा. चासनळी, संदीप बबन पवार ( वय वर्ष १९) रा.चासनळी व राहुल सुनील खैरनार (वय वर्ष १७) रा. चासनळी यांचा समावेश आहे पैकी आरोपी नंबर एक व दोन यांना गुन्ह्याचा अधिक तपास कामी १४ एप्रिल रोजी अटक करण्यात आली असून त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. यातील आरोपी नंबर तीन हा अल्पवयीन मुलगा आहे.या गुन्ह्याचा पोलिसांनी बारकाईने तपास करताना आरोपींनी गुन्ह्यात चोरून नेलेला मुद्देमाल त्यात २३६०० रुपयांचे १३०० किलो गहू प्रतिकिलो २२ प्रमाणे, ७५०० रुपये किमतीची १०० किलो सोयाबीन प्रति किलो ७५ रुपये यासह गुन्ह्याच्या वेळी वापरलेल्या १७०००० रुपये किमतीचा टाटा कंपनीचा छोटा हत्ती नंबर एम एच १७ बी डी ०२१७ असा एकूण २०६१०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
तालुका पोलीस स्टेशन स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप बोटे , पोलीस कॉन्स्टेबल युवराज खुळे, चालक पोलीस कॉन्स्टेबल रामा साळुंखे आदींनी सदर कारवाई केली.

Leave a Reply

You cannot copy content of this page