गौतम बॅंकेला ३ कोटी १४ लाख विक्रमी नफा

गौतम बॅंकेला ३ कोटी १४ लाख विक्रमी नफा

3 crore 14 lakh record profit for Gautam Bank

Rajendara Salkar,   वृत्तवेध ऑनलाईन! Fir 22 Apr 2022,17 :00Pm.

कोपरगाव: माजी आमदार अशोक काळे व श्री साई संस्थान अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली गौतम बंद केला चालू वर्षात ३ कोटी १४ लाख रुपयांचा ढोबळ नफा मिळाल्याची माहिती बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते व प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमुड यांनी दिली आहे.

ग्रामीण भागाच्या अर्थकारणाला चालना मिळावी या उद्देशातून कर्मवीर शंकरराव काळे यांनी कारखान्याबरोबरच गौतम बँकेची स्थापना केली. बँकेच्या माध्यमातून कामगार, शेतकरी व परिसरातील छोट्या-मोठ्या व्यवसायिकांची आर्थिक अडचण सुटण्यास मोठी मदत झाली. गौतम बॅंक खडतर परिस्थितीतून बाहेर पडत पुन्हा प्रगतीच्या दिशेने वाटचाल करताना आपला प्रगतीचा आलेख उंचावत ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात ०१ कोटीच्या तरतुदी करून २ कोटी १४ लाख निव्वळ नफा मिळविला आहे.
आज मितीस बँकेचे वसुल भागभांडवल रुपये ५००.९२ लाख इतके आहे. बँकेच्या ठेवी ९९ कोटी ७५ लाख असून बँकेने ६३ कोटी ५० लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. गुंतवणूक ४७ कोटी १२ लाख असून राखीव व इतर निधी १० कोटी ०८ लाख आहे. रिझर्व बँकेच्या मापदंडाप्रमाणे सी. आर. ए. आर. ९ टक्के असणे आवश्यक आहे त्याचे प्रमाण बँकेने १९.२१ टक्के राखलेले आहे. बँकेची तरलता मध्ये रुपये १६२८.४७ इतकी जादा तरतूद आहे. बँकेची लिक्विडिटी मध्ये अद्याप डिफॉल्ट नाही. अण्णासाहेब पाटील मागास विकास महामंडळाचे माध्यमातून बँकेने बँक कार्यक्षेत्रातील होतकरू ग्रामीण भागातील उद्योजकांना लघु उद्योग धंद्यास चालना देण्यासाठी सर्वसाधारण रुपये १५ कोटीचे बिनव्याजी कर्ज वितरण केलेले आहे. अशाप्रकारे बँकेने सर्व घटकांना न्याय देऊन प्रतिकूल परिस्थिती आपली प्रगती देखील साधली आहे. यामध्ये बँकेचे चेअरमन,व्हा. चेअरमन, संचालक मंडळ व तसेच सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी, सभासद, कर्जदार यांचे मोलाचे योगदान आहे याबद्दल माजी आमदार अशोक काळे व नामदार आशुतोष काळे यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page