कोपरगांव पंचायत समिती आवारात कोल्हेंचा पुर्णाकृती पुतळा उभारावा- ग्रामपंचायतींची ठरावाद्वारे मागणी

कोपरगांव पंचायत समिती आवारात कोल्हेंचा पुर्णाकृती पुतळा उभारावा- ग्रामपंचायतींची ठरावाद्वारे मागणी

A full-sized statue of a kohle should be erected in the premises of Kopargaon Panchayat Samiti – Demand by Gram Panchayat through a resolution

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Fir 22 Apr 2022,17 :30Pm.

 कोपरगाव : पंचायत समितीच्या आवारात माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा अशी मागणी जेउरपाटोदा, माहेगांवदेशमुख आणि शिंगणापुर ग्रामपंचायतींनी ठरावाद्वारे  केली आहे.

या मागणीचे निवेदन शुक्रवारी (२२) रोजी जेउरपाटोदाचे सरपंच मनिषा केकाण, माजी सभापती मच्छिंद्र केकाण, माहेगांव देशमुखचे सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे व शिंगणापूरच्या सरपंच सौ सुनिता भिमा संवत्सरकर यांनी गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी यांच्याकडे दिले आहे. मच्छिंद्र केकाण म्हणाले की, माजीमंत्री शंकरराव कोल्हे हे कोपरगांव तालुका पंचायत समितीचे पहिले तत्कालीन सभापती होते. त्यांनी या पदाच्या माध्यमातुन गोर गरीबांच्या कल्याणासाठी आणि पंचायत समितीच्या प्रत्येक गणात विकासाची प्रचंड कामे केलेली आहेत, पंचायत समितीबरोबरच त्यांनी अनेक पदाच्या माध्यमांतुन सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक, सहकार आदि क्षेत्रात उल्लेखनीय कामे करून कोपरगांव विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी जाणिवपुर्वक प्रयत्न केले. या महान नेत्याच्या राजकीय विचारांचा वारसा त्यांच्या शक्तीस्थळाच्या माध्यमातुन आगामी पिढयांना माहिती व्हावा यासाठी पंचायत समितीच्या आवारात त्यांचा पुर्णाकृती पुतळा उभारून त्यांच्या कार्याचे जतन व्हावे असे ते म्हणाले.

याप्रसंगी जेउरपाटोदा येथील चंद्रकांत सानप, कैलास सानप, मुरलीधर वायकर, रमेश केकाण, उपसरपंच जालिंदर गरूड, नितीन सांगळे, शंकर केकाण, सतिष केकाण, किशोर भाबड, अरूण आव्हाड, अशोक जगताप, स्वप्ना बोरावके, किरण केकाण, आनंदा गरूड, रामदास बागुल, संकेत केकाण, सुभाष सानप, तर माहेगांव देशमुखचे एल. डी पानगव्हाणे, कोल्हे साखर कारखान्यांचे संचालक सोपानराव पानगव्हाणे, लक्ष्मणराव पानगव्हाणे, प्रल्हाद काळे, अशोकराव पानगव्हाणे, अशोक भगवंता पानगव्हाणे, संतोष गंगाधर जाधव, भास्कर पानगव्हाणे, विलास जाधव, तर शिंगणापुरचे कैलास संवत्सरकर, भिमा संवत्सरकर, प्रमोद संवत्सरकर, श्रीकांत संवत्सरकर, लक्ष्मीकांत संवत्सरकर, माणिक कु-हे, शिंगणापुर सोसायटीचे अध्यक्ष यशवंत संवत्सरकर, भाउसाहेब वाघ, शेखर कु-हे, जालिंदर संवत्सरकर, अंकुश कु-हे यांच्यासह विविध संस्थाचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page