गोदावरी खोरे दूध संघाच्या कर्मचाऱ्यांना सरसकट दीड हजाराची वेतनवाढ – परजणे

गोदावरी खोरे दूध संघाच्या कर्मचाऱ्यांना सरसकट दीड हजाराची वेतनवाढ – परजणे

A total increase of one and a half thousand rupees to the employees of Godavari Valley Milk Union

 २० जूनपासून ही वेतनवाढ लागू करणारThe pay hike will be implemented from June 20

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Wed 27 Apr 2022,15 :30Pm.

कोपरगांव : गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील दूध उत्पादक संघाच्या कर्मचाऱ्यांना सरसकट दीड हजार रुपये वेतनवाढ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी नुकताच जाहीर केला. संघाचे संस्थापक दिवंगत नेते नामदेवराव परजणे पाटील (आण्णा) यांच्या पुण्यस्मरणानिमित्त येत्या २० जूनपासून ही वेतनवाढ लागू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सद्याची वाढलेली महागाई विचारात घेता वेतनवाढ करण्याचा निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना हातभार लावण्याचा विचार संचालक मंडळाने करुन कायम, प्रोबेशन, ट्रेनी अशा सर्व कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. या निर्णयाने संघाला वार्षिक १ कोटी ३० लाखाचा बोजा सहन करावा लागणार असला तरी कर्मचाऱ्यांचाही विचार करणे गरजेचे होते असेही श्री परजणे यांनी सांगितले. गेल्या दोन – तीन वर्षापूर्वी कोरोना काळात संघाला अनेक संकटांचा सामना करावा लागला. कोरोना काळात दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री घटल्याने संघाला मोठा आर्थिक फटका बसला. आजही संघ अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे. अशाही परिस्थितीत दूध उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर पेमेंट करुन त्यांच्या संसाराला हातभार लावला जनावरांसाठी चारा, पशुखाद्य, आरोग्य तपासणी, औषधोपचार अल्प दारात उपलब्ध करुन दिलेत. चारशे रुपये किमतीचे सॉर्टेडसिमेन अवघ्या दीडशे रुपयात उपलब्ध करुन देण्याचा महत्वपूर्ण उपक्रम कार्यक्षेत्रात राबविण्यात आला. या उपक्रमाचा शेतकऱ्यांनीही मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला. यातून संघाने मोठा आर्थिक भार सोसला.

संघाच्या ४७ व्या वर्धापनदिनानिमित्त भारत सरकारच्या राष्ट्रीय गोकूळ मिशन प्रकल्पांतर्गत बायफ संस्था, उरळीकांचन व संघाच्या संयुक्त सहकार्याने उच्च वंशावळीच्या देशी गायींच्या भ्रूण प्रत्यारोपणाचा कार्यक्रमही कार्यक्षेत्रात राबविण्यास प्रारंभ झालेला आहे. अनेक अडचणी असतानाही दूध उत्पादकांचे हीत लक्षात घेऊन संघ आर्थिक झळ सोसून विविध उपक्रम राबवीत आहे. संघाच्या वाटचालीत व प्रगतीत कर्मचाऱ्यांचाही मोठा सहभाग असल्याने त्यांच्याही प्रापंचिक परिस्थितीचा व सद्याच्या महागाईचा विचार करून सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट दीड हजार रुपये म्हणजे सुमारे सोळा टक्के वेतनवाढ देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. संघाच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणात वेतनवाढ करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या निर्णयाने कर्मचारी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page