कोपरगाव येथून अल्पवयीन मुलींचे अपहरण
Abduction of minor girls from Kopargaon
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Wed 27 Apr 2022,18 :00Pm.
कोपरगाव : कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अल्पवयीन मुलींला अज्ञात संशयीतांनी फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार १५ वर्षे तीन महिने वयाची इयत्ता ९ वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलगी कोपरगाव तालुक्यातील रहिवाशी असून ती शनिवारी २ एप्रिल रोजी दुपारी १३.३० वा. सुमारास संवत्सर ता.कोपरगाव येथून अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले. मैत्रीण व नातेवाईकांकडे शोध घेवून माहिती न मिळाल्याने मुलीच्या वडीलांनी मंगळवारी २६ एप्रिल रोजी १२.५४ वा. कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तींविरोधात भा.द.वि.कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. ३९१ आर.पी.पुंड हे करीत आहेत.
Post Views:
649