कलेतून रोजगार; ब्युटीशियन महिलेने स्वतःला अपडेट ठेवावे – सौ कल्याणी कोयटे
Employment through art; Beautician woman should keep herself updated – Mrs. Kalyani Koyte
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Fir 29 Apr 2022,18 :30Pm.
कोपरगाव : ब्युटीशियन मेकअप चे टेक्निक शिकायचे असते. ब्युटी पार्लर कोर्स कलेतून रोजगार देणार असल्याने महिलांमध्ये ते शिकण्याची भूक पाहिजे. या क्षेत्रात सातत्याने बदल होत असल्याने ब्युटीशियन महिलेने स्वतःला अपडेट ठेवावे.असे प्रतिपादन इंटरनॅशनल मेकअप आर्टीस्ट सौ कल्याणी कोयटे-हुरणे यांनी समता पतसंस्था यशवंतराव सभागृह येथे प्रोफेशनल मेकअप सेमिनारमध्ये मार्गदर्शन करतांना केले. माझी जन्मभूमी कोपरगाव असल्याने येथील महिलांसाठी मी काही देऊ शकते, याचा मला अभिमान असून महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा असे त्या म्हणाल्या,
प्रास्ताविकात आर्या ब्युटी पार्लरच्या सौ.अंजली चिने म्हणाल्या की, ब्युटी पार्लर क्षेत्रात येणाऱ्या महिला व तरुणींना चांगले मार्गदर्शन मिळावे यासाठी दुबई येथील आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेतील विजेते मिस इंडिया अनन्या शिंदे यांचा मेकअप करणाऱ्या नांदेड येथील इंटरनॅशनल मेकअप आर्टीस्ट, गिल्ट्स वूमन सलून अकॅडमी च्या माध्यमातून ५०० हून अधिक महिलांना प्रशिक्षण देणा-या सौ. कल्याणी हुरणे यांना या ठिकाणी खास बोलविण्यात आले आहे.
सौ कल्याणी हुरणे यांचे स्वागत आणि परिचय कमलेश कोते यांनी करून दिला. सत्कार सौ.अंजली चिने यांनी केला.
समता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ. सुहासिनी कोयटे,समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ. स्वाती कोयटे, ब्युटी क्षेत्रातील सौ.जयश्री पोटे, शिर्डीच्या सौ. साधना देहरेकर, येवल्याच्या सौ. प्रीती पटणी, मनमाडच्या सौ सुप्रिया जाधव,सौ. मानसी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. या सेमिनारला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुत्रसंचालन व आभार सौ. योगिता गोसावी यांनी मानले.