शहर पोलीस स्टेशन; इमारतीमुळे शहर वैभवात भर – सौ. स्नेहलता कोल्हे

शहर पोलीस स्टेशन; इमारतीमुळे शहर वैभवात भर – सौ. स्नेहलता कोल्हे

City police station; The building adds to the splendor of the city – Mrs. Snehalta Kohle

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on : Tue 3 May 2022,17.40
By
राजेंद्र सालकर

कोपरगांव  : तत्कालीन मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपरगांव शहर पोलिस ठाणे इमारतीस ३ कोटी ३२ लाख रूपयांचा निधी दिल्याने हे काम पूर्णत्वास आले आणि शहराच्या वैभवात यामुळे भर पडली असे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी मंगळवारी शहर पोलीस स्टेशनला पाहणी भेट दिली तेंव्हा केले.  यावेळी शहर पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी त्यांचे स्वागत व सत्कार केला.

 याप्रसंगी रविंद्र पाठक, जितेंद्र रणशुर, राहुल सुर्यवंशी, विवेक सोनवणे, भाजपाचे शहराध्यक्ष दत्ता काले, बबलु वाणी, वैभव गिरमे, अल्ताफ कुरेशी, गोपी गायकवाड, खालीक कुरेशी, संदिप देवकर, फकिर महंमद पहिलवान सुपेकर यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी नगरसेवक, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.        

  सौ. स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की, स्व. शंकरराव कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे, पालकमंत्री प्रा. राम शिंदे या सर्वांची मोलाची साथ मिळाल्याने शहरात वैभव टाकणारी ही पोलीस स्टेशनची इमारत उभी राहिली असल्याचे त्यांनी सांगितले. शेवटी रविंद्र पाठक यांनी आभार मानले.  

Leave a Reply

You cannot copy content of this page