सदस्यांच्या योगदानामुळे ग्रामीण भागाचा विकास – ना. आशुतोष काळे

सदस्यांच्या योगदानामुळे ग्रामीण भागाचा विकास – ना. आशुतोष काळे

Development of rural areas due to contribution of members – no. Ashutosh Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on : Tue 3 May 2022,18.00
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण आदी विभागात अनमोल योगदान दिल्यामुळे ग्रामीण भागाचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास झाला असल्याचे प्रतिपादन ना. आशुतोष काळे यांनी जि. प. व पं. स. सदस्यांचा निरोप समारंभ सत्कार सोहळयात केले.

ना. काळे पुढे म्हणाले की, कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनतेने टाकलेल्या विश्वासाची परतफेड सर्व सदस्यांनी गावात विकास कामे करून केली. शासनाच्या विविध योजनांचा लाभ हा समाजातील तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत नेवून त्यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरविला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले .

याप्रसंगी कारभारी आगवन,  राजेश परजणे,  सुधाकर दंडवते, सौ. विमल आगवन, सौ. सोनाली रोहमारे, सौ. सोनाली साबळे,  सौ. अनुसया होन, सौ. पौर्णिमा जगधने,  अर्जुन काळे, अनिल कदम, माजी सदस्य श्रावण आसने, मधुकर टेके, बाळासाहेब रहाणे, दिलीप दाणे,  गोरक्षनाथ जामदार, रोहिदास होन, प्रसाद साबळे, राहुल जगधने, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, अभियंता उत्तम पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास घोलप, डॉ. काटे मॅडम, गटशिक्षण अधिकारी शबाना शेख, कृषी अधिकारी पंडित वाघिरे आदींसह पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page