ईदची नमाज होताच जय महाकाल मित्रमंडळाकडून मुस्लिम बांधवांना थंडगार शुभेच्छा

ईदची नमाज होताच जय महाकाल मित्रमंडळाकडून मुस्लिम बांधवांना थंडगार शुभेच्छा

As soon as the Eid prayers are over, greetings from Jai Mahakal Friends to the Muslim Brotherhood

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on :Thu 5 May 2022,17.00
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : जातीय सलोखा राखण्यासाठी यंदा शिवसेना प्रणीत जय महाकाल मित्र मंडळाने पुढाकार घेतला आहे. रमजान ईदची नमाज होताच प्रत्येक ईदगाहसमोर जय महाकाल मित्र मंडळाचे शिवसैनिक थंडगार लस्सी देऊन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या , अशी माहिती उपशहरप्रमुख गगन हाडा यांनी दिली.

हिंदू-मुस्लिम समाजात भाईचारा अबाधित रहावा यासाठी काही सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष प्रयत्न करीत आहेत. त्यातच यंदा शिवसेना प्रणित जय महाकाल मित्र मंडळ कोर्ट रोड यांनीही पुढाकार घेतला आहे. सर्वधर्मीय बांधव एकत्र असतील तरच समाजाचा विकास शक्य आहे. महाराष्ट्रात सर्वजण गुण्यागोविंदाने रहावे हे प्रत्येक व्यक्तीला वाटत असते. कोणालाही वाद-विवाद नको असतो. यंदा प्रथमच शिवसेना उपशहरप्रमुख गगन हाडा यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना प्रणित जय महाकाल मित्र मंडळ कोर्ट रोड यांनी पुढाकार घेतला आहे. ईदची नमाज अदा केल्यानंतर ईदगाह समोर जय महाकाल मंडळाच्या शिवसैनिकांनी प्रत्येक मुस्लिम बांधवांना शिस्तबध्दतेने थंडगार गोड लस्सी पाकिटाचे वाटप करून ईदच्या शुभेच्छा दिल्या.

माजी शहरप्रमुख भरत मोरे, विधानसभा संघटक असलम शेख, मुन्नाभाई मन्सुरी, उपशहरप्रमुख भुषण पाटणकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत व उपशहरप्रमुख गगन हाडा आदी शिवसैनिक

यावेळी माजी शहरप्रमुख भरत मोरे, विधानसभा संघटक असलम शेख, मुन्नाभाई मन्सुरी, उपशहरप्रमुख भुषण पाटणकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत व उपशहरप्रमुख गगन हाडा यांच्या नेतृत्वाखाली भावेश थोरात,राहुल हाडा, चेतन निदाने,गौतम हाडा, रोहित सासणे,सोनू निर्भवणे,संदीप हाडा, प्रिन्स घोडे,सोनू साबळे, गौतम निंदाने, स्वप्निल निर्भवणे, लोकेश हाडा,चेतन पवार यांनी यावेळी सुमारे अडीच हजार पाकिटांचे वाटप करण्यात आले. गोदावरी दूध संघाकडुन लस्सी खरेदी करण्यात आली . १३ रुपये प्रती पाकीट लसीचा दर आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page