समताच्या ठेवी अभेद्य सुरक्षा कवचामुळे अधिक सुरक्षित -आ. रणधीर सावरकर,
Equitable deposits more secure due to impenetrable security shield -A. Randhir Savarkar,
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on : Thu 12 May 2022, 18.50
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव – महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीत महत्वपूर्ण योगदान देणारी समता पतसंस्थेने ३७ व्या वर्षात पदार्पण केले आहे. असून समताच्या ठेवीदारांच्या ठेवी समताच्या अभेद्य सुरक्षा कवचामुळे अधिक सुरक्षित असल्याचे गौरवोद्गार समता इंटरनॅशनल स्कूल येथील समता ग्राहक कृतज्ञता सोहळ्यात अकोला निशांत मल्टीस्टेटचे अध्यक्ष तथा आ. रणधीर सावरकर यांनी व्यक्त केले. कोरोना काळातील सभासद, ठेवीदार, कर्जदार यांना पुरविलेल्या सुविधा आणि त्यांची केलेली सेवा ही कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले . अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन काका कोयटे होते.
आ. सावरकर पुढे म्हणाले ,काका कोयटे राज्य पतसंस्था फेडरेशन चे अध्यक्ष म्हणून सहकारात उल्लेखनीय काम करत असताना शैक्षणिक क्षेत्रात ही संदीप कोयटे व सौ. स्वाती कोयटे यांच्यासारख्या कुशल नेतृत्वाच्या आधारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर गुणवत्तापूर्ण शिक्षण देत एक सामाजिक दायित्वाची भूमिका पार पाडत प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
प्रास्ताविक करताना संदीप कोयटे म्हणाले, आपल्या सारख्या सभासद,ठेवीदारांच्या विश्वासामुळे समताने आज ३७ व्या वर्षात पदार्पण केले असून सोनेतारणासारख्या सुरक्षित कर्ज प्रकारचा अवलंब करत लिक्विडीटी बेस प्रोटेक्शन फंड अंतर्गत समताच्या ८०७९४ ठेवीदारांच्या ९९.३५℅ ठेवीदारांच्या प्रत्येकी १५ लाख रुपायापर्यंतच्या ठेवी सुरक्षित झाल्या आहे. उर्वरित ठेवीदारांच्या ठेवी अति सुरक्षित कर्ज प्रकारामुळे त्या ही अति सुरक्षित आहे. या पुढे ही महाराष्ट्रातील समताच्या सर्वच ठेवीदारांच्या ठेवींना अधिक अभेद्य सुरक्षा कवच प्राप्त करून देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे समताच्या सभासद,ठेवीदारांचे संस्थेत येणे-जाणे, भेटी-गाठी होत नसल्याने समताच्या ३७ व्या वर्धापन दिनी समताचे सभासद,ठेवीदारांचा कृतज्ञता सोहळा आयोजित करून त्यांना या निमित्ताने चला हवा येऊ द्या मालिकेतील कलाकार भाऊ कदम,श्रेया बुगडे,स्नेहल शिदम व अंकुर गाढवे यांच्या हास्य नाटिकांची मेजवानी ही देण्यात आली.
कार्यक्रमाला प्रेरणा सुरेश वाबळे, शिवाजी कपाळे, रवींद्र कानडे, चंद्रकांत शेजुळ,महात्मा श्रीकांत साखरे,राकेश न्याती, विठ्ठल अभंग, गोपीनाथ निळकंठ, अशोक कोठारी, आशुतोष पटवर्धन, तहसीलदार विजय बोरुडे,पोलिस निरीक्षक वासुदेव देसले, सहा. निबंधक एन.जी ठोंबळ गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, गटशिक्षणाधिकारी सौ. शबाना शेख, समता स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ स्वाती कोयटे यांची प्रमुख उपस्थिती होती. समता पतसंस्थेचे संचालक गुलाबचंद अग्रवाल,सौ अरविंद पटेल, जितूभाई शहा, चांगदेव शिरोडे, गुलशन होडे,निरव रावलिया, कचरू मोकळ, अशोक दरक, मुख्य कार्यालयाचे अधिकारी, शाखाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.उपस्थितांचे आभार जनरल मॅनेजर सचिन भट्टड यांनी मानले.