शिवसेनेचे नगरसेवक योगेश बागूल व कैलास जाधव यांना जिल्हाधिर्यांनी अपात्र ठरविले
Shiv Sena corporators Yogesh Bagul and Kailas Jadhav were disqualified by the district collector
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on : Fir 13 May 2022,17.20
By
राजेंद्र सालकर
कोपरगांव : महाराष्ट्र नगरपरिषदा नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ४४ अंतर्गत आदेशान्वये शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष योगेश तुळशीदास बागुल व स्विकृत नगरसेवक व उपजिल्हा प्रमुख कैलास द्वारकानाथ जाधव या दोघांचे नगरसेवक पद अनर्ह (अपात्र) ठरविण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी २७ एप्रिल बुधवार रोजी पारित केला असल्याची माहिती कोपरगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष विद्यासागर शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बागूल व जाधव यांना पुढील आदेश नगरपालिकेची निवडणुक लढवता येणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या बाबत विद्यासागर शिंदे यांनी अधिक माहिती दिली की, दि २२ जुलै २०२१ रोजी अतिक्रमण काढण्यात आल्याचा राग मनात धरुन नगरपालिका कार्यालयात जावून कार्यालयाच्या दरवाजास लाथ मारली, तत्कालिन उपमुख्याधिकारी सुनिल गोर्डे यांना शिवीगाळ करुन मारहाण केली व कार्यालयाची तोडफोड केली होती. बागूल व जाधव यांच्या विरोधात कोपरगांव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता
या संदर्भात मनसे पदाधिकारी सुनिल जनार्धन फंड कोपरगांव व कर्मचारी प्रतिनिधी हेमंत यशवंत ढगे अहमदनगर यांनी योगेश बागूल व कैलास जाधव यांच्या विरोधात महाराष्ट्र नगरपरिषदा नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५चे कलम ४४ अंन्वये विवाद अर्ज ४/२०२२ दाखल केला होता अर्जदार फंड यांच्या वतीने वकील विद्यासागर शिंदे यांनी बाजु मांडतांना उच्च न्यायालयाच्या निकालाचा आधार घेतला तो जिल्हाधिकारी यांची ग्राहय धरला. तसेच तत्कालिन मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे व उपमुख्याधिकारी सुनिल गोर्डे यांनी देखील त्यांची भूमिका मांडली. तर सामनेवाले योगेश बागुल व कैलास जाधव यांच्यातर्फे वकील देवदेशपांडे यांनी बाजु मांडली. उभय पक्षकारांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दि २७ एप्रिल २०२२ रोजी केलेल्या आदेशात सामनेवाले योगेश बागुल व कैलास जाधव यां दोघांना पालिका सदस्य म्हणून राहण्यास अनर्ह/अपात्र ठरविण्यात आले. दरम्यान या निकालावर योगेश बागूल व कैलास जाधव हे नगरविकास मंत्रालयाकडे दाद मागणार असल्याचे सांगितले.