कोपरगांव:
ग्रामीण भागात राहून गेल्या पस्तीस वर्षात संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने घडविले हजारो यशस्वी अभियंते, ज्यांनी आज देशासह परदेशात नोकरीत उच्चपदस्थ राहून व व्यवसायात यशस्वी उद्योजक म्हणून ठसा उमटवून आपल्या कार्यकर्तृत्वाची यशोगाथा रचली याची दखल घेऊन अशा विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट च्या वतीने विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी केली आहे. माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार जाहीर करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
सदर प्रसंगी कार्याध्यक्ष नितिनदादा कोल्हे, अमित कोल्हे, ए. डी. अंत्रे व प्राचार्य डाॅ. डी. एन. क्यातनवार उपस्थित होते.
संजीवनीचे ब्रॅन्ड अम्बॅसॅडर
म्हणुन बिरूदावली असणारे व युएसए मधिल होस्टन येथिल मॅकडाॅरमॅट इंटरनॅशनल या बहुराष्ट्रीय कंपनीचे ग्लोबल व्हाईस प्रेसिडेंट, चिफ इन्फर्मेशन ऑफिसर आणि चिफ डिजीटल ऑफिसर म्हणुन कार्यरत असलेले श्री आकाश खुराना यांना ‘लाईफ टाईम अचिव्हमेंट ’ पुरस्कार जाहीर करण्यात आला.
ऑस्टिन , युएसए येथे आयबीएम कंपनीमध्ये सिनिअर टेक्निकल स्टाफ मेंबर पदावर कार्यरत असलेले आणि स्वतःच्या नावावर ३०० पेक्षा अधिक पेटेंट असलेले संदिप रमेश पाटील यांना तंत्रज्ञान क्षेत्रात भरीव कार्य केल्याबध्दल ‘टेक्निकल एक्सलन्स अवार्ड’ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
स्वीफ्टस् इंडिया लि, नाशिक येथे आर अँड डी विभागातुन आपल्या करीअरला सुरूवात करून नंतर थेट युएसए मध्ये पुढील करीअर करता करता सुमारे २,५०,००० कर्मचारी असलेल्या बॅन्क ऑफ अमेरिकाच्या व्हाईस प्रेसिडेंट असलेल्या सारीका जहागीरदार यांना ‘दि इन्स्पायरींग वुमन अवार्ड’ हा खरोखरच सर्व महिला वर्गाला अभिमान वाटावा असा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
संजीवनीच्या अनेक माजी विध्यार्थ्यानी नोकरी मागण्यापेक्षा स्वतःचे कारखाने उभारून अनेकांना रोजगार दिला आहे. यातीलच एक संभाजी चावले, यांनी देश परदेशात नामांकित कंपन्यांमध्ये अनुभव घेत स्वतःच्या तीन कंपन्या सुरू करून अनेकांच्या हाताला काम देवुन यशस्वी उद्योजक म्हणुन नावलौकिक प्राप्त केला. त्यांच्या या धाडसाची व जिध्दीची दखल घेत त्यांना ‘दि एन्टरप्रुनर अवार्ड’ पुरस्कार जाहिर करण्यात आला.
तर चीन मधिल झेजिअंग प्रांतात गीली या ऑटोमोटिव्ह क्षेत्रात कार्य असलेल्या कंपनीत ऑटोमोटिव्ह डीझाईनर या पदावर कार्यरत असलेले व अल्पावधीमध्ये यशस्वी भरारी घेतलेले भूषण देशमुख यांना ‘दि यंग अचिव्हर अवार्ड’ जाहीर करण्यात आला.
चौकट :
पुरस्कार प्राप्त विद्यार्थी म्हणतात आम्ही संजीवनी मध्ये शिकत असताना नियमीत अभ्यासक्रमाबरोबरच अभियांत्रिकीचे अद्ययावत ज्ञान,
संजीवनीने रूजविलेली शिस्त, आणि प्रामाणिक कष्ट यामुळे आम्ही यशस्वी झालो असलो तरी खऱ्या अर्थाने आमच्या जीवनाला संजीवनीमुळे संजीवनी मिळाली आहे.
फोटो ओळीः पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचे फोटो