बुद्धविहार’ संस्कार केंद्र झाली पाहिजे – ना. आशुतोष काळे

‘बुद्धविहार’ संस्कार केंद्र झाली पाहिजे – ना. आशुतोष काळे

‘Buddha Vihar’ should become a ritual center – no. Ashutosh Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on : Thu 19 May 2022, 15.20
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव :  गौतम बुद्ध  केवळ एका समाजासाठी किंवा एका समूहासाठी नव्हते. गौतम बुद्धांचा धम्म हा कुठल्या एका विशिष्ठ समाजाचा उद्धार करण्याचा मार्ग नव्हे, तर समस्त मानवतेला मिळालेले ते वरदान आहे. त्यामुळे बुद्धविहार हे केवळ धार्मिक केंद्र न राहता बुद्धविहार हे संस्कार केंद्र झाली पाहिजेत अशी अपेक्षा ना. आशुतोष काळे यांनी वेळापूर  ‘तक्षशिला बुद्धविहार’ व बुद्धप्रतिरूप स्थापना’ कार्यक्रमात व्यक्त केली.

ना काळे पुढे म्हणाले की, आपल्या देशात सर्व जाती धर्माचे लॉक गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहे हे आपले भूषण आहे. आपल्या देशाला सर्वच स्तरावर संपन्न करण्यासाठी सर्व समाज एक विचाराने एकत्रित राहणे हि काळाची गरज आहे. ते समाजाच्या आणि आपल्या देशाच्या हिताचे असल्याचे ना. त्यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी बुद्धिस्ट सोसायटी विश्वस्त ॲड. बी.के. बर्वे, विक्री कर विभागाचे उपायुक्त दिलीप झाल्टे, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, साहित्यिक गंगाधर आहिरे, सूर्यभान घेगडमल, त्र्यंबकराव भोसले, विनोद आहिरे, ॲड. भास्करराव गंगावणे, दिलीप वाबळे,  संचालक राजेंद्र मेहेरखांब,  सौ. पौर्णिमा जगधने,  सरपंच शशिकांत वाबळे, उपसरपंच मच्छिन्द्र हाळनोर,  वसंतराव वैराळ, दगु गोरे, गणपतराव गोरे, अशोक आहेर, अशोक भगत, शिवाजी मोकळ, शंकरराव मोकळ, तात्याराम मोकळ, दशरथ पठारे, बाळासाहेब पगारे, राहुल जगधने, दिपक पाटोळे, रावसाहेब मोकळ आदींसह पंचक्रोशीतील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Leave a Reply

You cannot copy content of this page