मतदार संघातील कामे तातडीने पूर्ण करा – ना. आशुतोष काळे
Complete the work in the constituency immediately – no. Ashutosh Kale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on : Thu 19 May 2022, 18.00
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : कोपरगाव मतदार संघातील कामे प्रस्तावित व काही झाली आहेत. जी कामे रेंगाळलेली आहेत त्याची कारणे शोधा व ती तातडीने पूर्ण करा, अशा सूचना गौतम बँकेतील आढावा बैठकीत देऊन कामातील उणिवा बाबत अधिकाऱ्यांचे ना. आशुतोष काळे यांनी कान टोचले.
या आढावा बैठकीसाठी पंचायत समिती, नगरपरिषद, एस.टी. महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, समृद्धी महामार्ग, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, मुख्यमंत्री ग्रामसडक आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आशुतोष काळे म्हणाले की, मतदार संघातील अनेक रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत तर अनेक रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. पावसाळा थोड्याच दिवसांवर येवून ठेपला असतांना रस्त्यांची कामे पावसाळ्याच्या आत चांगल्या दर्जाची तातडीने पूर्ण करा. जून महिन्यापासून शाळा होईल त्या दिवसापासून बस सेवेचे नियोजन करा. राहाता तालुक्यातील ११ गावांसाठी उपयुक्त असणारी बस सेवा पूर्ववत सुरु करा,. डाऊच खुर्द गावाच्या नवीन साठवण तलावाचे कामाचा वेग वाढवा, तलावाचे काम आराखड्यानुसार गुणवत्तेत व लवकरात लवकर पूर्ण करावे अशा सूचना दिल्या.
यावेळी गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे अभियंता लोखंडे, उपअभियंता चोळके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रशांत वाकचौरे, पंचायत समिती अभियंता उत्तमराव पवार, विस्तार अधिकारी डी.ओ. रानमाळ, कोपरगाव बस डेपो मॅनेजर अभिजित चौधरी, श्रीरामपूर बस डेपो मॅनेजर राकेश शेवडे, काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, कारभारी आगवन, गोरक्षनाथ जामदार, अर्जुनराव काळे, मधुकर टेके, अनिल कदम, श्रावण आसने, दिलीप दाणे, राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, धरमचंद बागरेचा, शहराध्यक्ष सुनील गंगूले, चारुदत्त सिनगर, विरेन बोरावके, मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, रमेश गवळी, फकीर कुरेशी, दिनकर खरे. डाऊच खुर्दचे सरपंच संजय गुरसळ, माजी उपसरपंच राजेंद्र पुंगळ, संतोष पवार, शंकर गुरसळ, दिगंबर पवार, दौलतराव गुरसळ, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे वाय.जी. पाटील, भाभा पाटील, राज कन्स्ट्रक्शनचे माने, सुमेध वैद्य, शेखर मेटकरी आदी उपस्थित होते.