महात्मा फुले पतसंस्था : अध्यक्षपदी हरीभाऊ गिरमे तर उपाध्यक्षपदी अनिल शेवते
Mahatma Phule Patsanstha: Haribhau Girme as President and Anil Shewte as Vice President
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on : Thu 19 May 2022, 18.20
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : महात्मा ज्योतिबा फुले सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी हेमंत उर्फ हरिभाऊ गिरमे यांची बिनविरोध निवड झाली. सलग दुसऱ्यांदा त्यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. तर उपाध्यक्ष पदी अनिल शेवते यांना विराजमान होता आले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी नामदेवराव ठोंबळ यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी झाल्या.
यावेळी विजय पांढरे, नरेंद्र गिरमे, प्रमोद गोंजारे, कैलास खैरे, दिलीप बनकर, शैलेश बनकर, धनंजय झगडे, सौ निता गिरमे, श्रीमती द्रोपदाबाई मालकर संचालक हजर होते प्रास्ताविक संचालक कैलास खैरे यांनी केले तर आभार संचालक प्रमोद गोंजारे यांनी मानले.
यावेळी नवनिर्वाचित चेअरमन व्हाईस चेअरमन यांच्या हस्ते निवडणूक निर्णय अधिकारी नामदेवराव ठोंबळ यांचा सत्कार करण्यात आला.