कोपरगावात बाळासाहेब ठाकरे  स्मारकासाठी निधीची मागणी

कोपरगावात बाळासाहेब ठाकरे  स्मारकासाठी निधीची मागणी

Demand for funds for Balasaheb Thackeray Memorial in Kopargaon

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on : Fir 20 May 2022, 17.00
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : शिवसेना प्रमुख हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक (Balasaheb Thackeray Memorial) रिक्षा स्टँड चौक येथे उभारण्यात येणार आहे. त्यासाठी खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडे शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष व शिवसेना नगरपालिका गटनेते योगेश बागुल यांनी निधीची मागणी केली आहे.

कोपरगाव नगरपालिका हद्दीमधील रिक्षा स्टॅन्ड चौक येथे हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी नियोजित जागा आहे या जागेसाठी नगरपालिकेने ठराव देखील केलेला आहे. रिक्षा स्टँड चौक ते धर्मवीर संभाजी महाराज चौक या रस्त्याला धर्मवीर संभाजी महाराज रस्ता असे नाव देण्यात यावे अशीही मागणी यावेळी बागुल यांनी खासदार लोखंडे यांच्याकडे केली.

खासदार सदाशिव लोखंडे कोपरगाव येथे आले असता माजी नगराध्यक्ष संजय सातभाई यांच्या निवासस्थाने शिवसेना पदाधिकार्‍यांची बैठक झाली.

या बैठकीत योगेश बागुल यांनी कोपरगाव येथे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी निधीची मागणी केली. माजी नगराध्यक्ष संजय सातभाई यांनी कोपरगाव ब्राह्मण सभेसाठी समाज सभागृहाची मागणी केली.तर विधानसभा संघटक असलम शेख यांनी देखील १०५ येथील नवीन ईदगाह मैदानाचे काँक्रिटीकरण करून मिळावे अशी मागणी केली. या तीन्ही मागण्यांची खासदार सदाशिव लोखंडे यांनी दखल घेतली असून सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

यावेळी खासदार सदाशिव लोखंडे यांनी त्या ठिकाणी उपस्थित असलेले मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना याबाबत प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना केल्या.

यावेळी उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, प्रमोद लबडे, शिवसेनेचे नितीन औताडे, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, बाळासाहेब जाधव तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे, उपनगराध्यक्ष गटनेते योगेश बागुल, विधानसभा संघटक असलम शेख, नगरसेविका ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई, नगरसेवक कालूआप्पा आव्हाड, अतुल काले, एसटी कामगार सेना शहराध्यक्ष भरत मोरे, सनी वाघ, रवी कथले,गणेश जाधव,सिद्धार्थ शेळके नितिश बोराडे, आशिष निकुंभ, मयूर लचुरे, पप्पू पडियार, रंजन जाधव, भूषण पाटणकर, गगन हाडा यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी हजर होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page