संजीवनी  ज्यु. काॅलेजचा इ. १२ वी चा निकाल १०० टक्के

संजीवनी  ज्यु. काॅलेजचा इ. १२ वी चा निकाल १०० टक्के

सायन्स शाखेत  पल्लवी गावित्रे ९० टक्के

काॅमर्स शाखेत  अभिषेक  संचेती ९५ टक्के  प्रथम

कोपरगांव: महाराष्ट्र  राज्य उच्च माध्यमिक मंडळाने मार्च २०२० मध्ये घेतलेल्या इ. १२ वी च्या परीक्षांचेे निकाल आज जाहिर झाले असुन यात संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स  संचलीत सर्व ज्युनिअर काॅलेजचा निकाल १०० टक्के लागला आहे. संजीवनीला  मागील पाच वर्षांची  परंपरा कायम ठेवण्यात यश  आले आहे. सायन्स शाखेत  पल्लवी रमेश  गावित्रे हीने ९० टक्के गुण मिळवुन सर्व प्रथम क्रमांकाने उत्तिर्ण होण्याचा बहुमान पटकाविला तर काॅमर्स शाखेत  अभिशेक रविंद्र संचेती याने ९५  टक्के गुण मिळवुन प्रथम क्रमांकाने उत्तिर्ण होवुन आपली  प्रतिभा संपन्नता सिध्द केली, अशी  माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने देण्यात आली आहे.

सायन्स शाखेत    साईराज प्रदिप भाकरे याने ८९. २३ टक्के गुण मिळवुन दुसरा क्रमांक पटकाविला तर रसिका  रमेश  सोमवंशी हीने ८८. ९२ टक्के गुण मिळवुन तिसऱ्या  क्रमांकाची मानकरी ठरली. काॅमर्स शाखेत  डाॅली मानकचंद लोढा हीने ९२. ३१ टक्के गुण मिळवुन दुसरा क्रमांक मिळवीला तर निधी हरीशकुमार छतानी हीने ९२. १५ टक्के गुण मिळवुन तिसरा क्रमांक मिळविला. याही व्यतिरीक्त सायन्स शाखेत  श्रृती बाबासाहेब खैरनार (८८. ७७ टक्के), संकेत संपत कोल्हे  (८७. ३८ टक्के), क्रिष्णा  भारत काकड (८४. ७७ टक्के), अक्षय राजेश  म्हाळसकर (८४. ३१टक्के), पियुश नानासाहेब मुंजल ८० टक्के) असे गुण मिळविले.

तर  काॅमर्स शाखेत  रोशन श्रावण रोशनकर (९१. ५४ टक्के), विशाखा विनोद वादे (९०. ४६ टक्के), वैष्णवी ज्ञानेष्वर कुलकर्णी (९०. ४६ टक्के), आदिती अरूण कुलकर्णी (८७. २३ टक्के), चंचल प्रमोद झंजारी (८६. ९२ टक्के), आरती अनिल  आंबकेर (८४. ७८ टक्के) व  पार्थ किरण भालेराव (८०. ६२ टक्के) असे गुण मिळवुन नेत्रदिपक यश  संपादन केले.

संजीवनी  ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष श्री शंकरराव  कोल्हे, कार्याध्यक्ष  नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे व विश्वस्त   सुमित कोल्हे यांनी सर्व सर्व गुणवंत व यशवंत विध्यार्थी, त्यांचे प्राचार्य व शिक्षकांचे नेत्रदिपक यशाबध्दल अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page