कोपरगाव पालिका आरोग्य कर्मचारी वसाहत प्रस्ताव तयार करा-ना. काळे
Kopargaon Palika Health Staff Colony Proposal-No. kale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 8 June, 17.30
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : कोपरगाव नगरपालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वसाहतीचा वसाहतीची दुरवस्था झाली असून नव्या १०० फ्लॅटच्या वसाहतीसाठी प्रस्ताव तयार करा अशा सूचना नामदार आशुतोष काळे यांनी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना दिल्या आहेत. नुकतीच त्यांनी या जुन्या वसाहत भागाची पाहणी केली
मागील अनेक वर्षापासून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वसाहतीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे या वसाहतीची अत्यंत वाईट अवस्था झाल्यामुळे वसाहतीमध्ये राहणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. याबाबत त्यांनी ना.आशुतोष काळे यांच्याकडे आपल्या अडचणी मांडल्या होत्या. त्याची दखल घेऊन त्यांनी नुकतीच स्वच्छता कर्मचारी राहत असलेल्या परिसराची पाहणी केली यावेळी वसाहतीची झाली दुरवस्था पाहून त्यांनी तातडीने नवीन वसाहतीसाठी प्रस्ताव तयार करण्यास सांगितले. नगरविकास विभागाकडून सर्व सोयींनी युक्त १०० फ्लॅटची सुसज्ज वसाहत उभारण्यासाठी आपण जातीने लक्ष घालणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मुख्याधिकारी शांताराम गोसावी, आरोग्य अधिकारी सुनील आरण, रवी दिनकर, केवल हाडा, केदु निरभवणे, रणजित तोळे, भरत साबळे, कमलजीत लाटे, मधुकर वालेकर, पवन हाडा, सागर साबळे, निलेश साबळे, रोहित डाके, कमलेश साबळे, राजेश भुजारे, देवेंद्र डाके, सनी लोंढे, सावन निरभवणे, योगेश साळवे, आनंद वाल्हेकर, अमोल लोखंडे, सतीश साबळे, राघू लोंढे, रोहित डाके, अजय हाडा, अमोल दिनकर आदी उपस्थित होते.