संजीवनी ज्युनिअर काॅलेजचा इ. १२ वीचा निकाल १०० टक्के

संजीवनी ज्युनिअर काॅलेजचा इ. १२ वीचा निकाल १०० टक्के

 Sanjeevani Junior College. 12th result 100 percent

वाणिज्य शाखेत फहिम खान ९३. ५० टक्के तर विज्ञान शाखेत सार्थक जोशी ९२. ५० टक्के गुण मिळवुन सर्व प्रथम  Fahim Khan 93 in Commerce. 50 percent, while Sarthak Joshi 92 in science. First of all with 50% marks

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 8 June, 18.00
By
राजेंद्र सालकर

कोपरगांव: महाराष्ट्र  राज्य उच्च माध्यमिक मंडळाने मार्च २०२२ मध्ये घेतलेल्या इ. १२ वी  च्या परीक्षांचे निकाल आज मंडळाच्या संकेत स्थळावर जाहीर झाले असुन यात संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स  संचलित संजीवनी ज्युनिअर काॅलेजचा निकाल १००  टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेत फहिम मोहिन खान याने ९३. ५० टक्के तर विज्ञान शाखेत सार्थक विरेंद्र जोशी  याने ९२. ५० टक्के गुण मिळवुनमहाविद्यालयात सर्व प्रथम क्रमांकाने उत्तिर्ण होण्याचा बहुमान पटकाविला आहे. महाविद्यालयाच्या स्थापनेपासुन सलग सातव्या वर्षीही १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे, अशी माहिती काॅलेजच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

पत्रकात पुढे म्हटले आहे की विज्ञान शाखेत तेजस विकास चौधरी याने ९२. ३३ टक्के गुण मिळवुन दुसरा तर पार्थ सोमनाथ गायकवाड याने ९१. ५० टक्के गुण मिळवुन तिसरा क्रमांक पटकाविला. वाणिज्य शाखेत इशिता संदीप कानकुबजी व प्रथमेश  दिपक सोनार यांनी प्रत्येकी ९२. ०२ टक्के गुण मिळवुन दुसऱ्या  क्रमांकाने उत्तिर्ण होण्याचा बहुमान मिळविला तर अनुज जितेंद्र देशपांडे व स्नेहल रतन गायकवाड यांनी प्रत्येकी ९२ टक्के गुण मिळवुन तिसऱ्या  क्रमांकाचे स्थान पटकाविले.

विज्ञान शाखेत एकुण १९५ विद्यार्थ्यांनी  परीक्षा दिली. त्यापैकी ९ विद्यार्थ्यांनी  ९० टक्यांपेक्षा अधिक गुण मिळकवले. १२० विद्यार्थी ८० ते ८९ टक्केवारी मध्ये आहेत. ६१ विद्यार्थी ७० ते ७९ टक्केवारीच्या रेंजमध्ये आहेत. तर फक्त ५ विध्यार्थी ६० ते ६९ टक्केवारी मध्ये आहेत. एकुण ९४ विद्यार्थ्यांनी  वाणिज्य शाखेची परीक्षा दिली. यात ८ विद्यार्थ्यांनी ९० टक्यांपेक्षा अधिक गुण मिळविले. ५८ विद्यार्थी ८० ते ८९ टक्केवारीच्या ग्रुपमध्ये उत्तिर्ण झाले. २५ विध्यार्थी हे ७० ते ७९ टक्केवारी मध्ये उत्तिर्ण झालेत तर फक्त ३ विध्यार्थी ६० ते ६९ टक्केवरीच्या रेंजमध्ये उत्तिर्ण झालेत. संजीवनी ज्युनिअर काॅलेज मधिल इ. १२ वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी  केवळ अभ्यासात्मक गुणवत्ताच साधली नाही तर या सर्व विद्यार्थ्यांनी  इतर क्रीडा, सांस्कुतिक, विविध स्पर्धा अशा  सर्व बाबतींमध्ये सहभाग नोंदवुन त्यातही यश  संपादन करून सर्वच्या सर्व प्रथम श्रेणी तसेच काही विशेष  प्राविण्यासह उत्तिर्ण झाले आहे, ही संजीवनीच्या गुणवत्ता व दर्जाची पावती पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

विद्यार्थ्यांच्या  या घवघवीत यशाबध्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे व विश्वस्त  शसुमित कोल्हे यांनी सर्व गुणवंत विध्यार्थी, त्यांचे भाग्यवान पालक, प्राचार्य डाॅ. राजन शेंडगे  व त्यांची सर्व टीम यांचे अभिनंदन केले आहे. 

Leave a Reply

You cannot copy content of this page