१० कोटी निधी मंजूरीने रस्त्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यात यश -ना. आशुतोष काळे

१० कोटी निधी मंजूरीने रस्त्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यात यश -ना. आशुतोष काळे

With the approval of 10 crore funds, the road problem has been solved permanently. Ashutosh Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 18 June, 17.20
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : तालुक्याच्या पश्चिम भागातील राजमार्ग ७ वरील देर्डे फाटा ते भरवस फाटा या रस्त्याची दुरावस्था झाल्याने अनेक गावांतील व्यवसायावर देखील याचा मोठा परिणाम झाला होता.शहाजापूर ते तालुका हद्दीपर्यंत रस्त्यासाठी १० कोटी निधी मंजूर झाल्याने या रस्त्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यात यश मिळाल्याची माहिती ना. आशुतोष काळे यांनी वेळापुर येथील कार्यक्रमात दिली .

ना काळे म्हणाले की, मतदार संघाच्या रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी महाविकास आघाडी सरकारची मोठी मदत झाली असून दळणवळणाच्या सोयी सुविधा निर्माण होण्याचे दृष्टीने मतदार संघातील बहुतांश रस्त्यांची दर्जोंन्नती करून रस्ते विकास करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी वेळापूरच्या सोसायटीच्या काळे गटाचे नवनिर्वाचित संचालकांचा ना.आशुतोष काळे यांनी सत्कार करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी सौ. पौर्णिमा जगधने, अर्जुन काळे, सुधाकर दंडवते, अशोक तिरसे, सचिन रोहमारे, सरपंच शशिकांत वाबळे, वसंतराव वैराळ, अशोक आहेर, गणपत वैराळ, रतनराव कदम, श्रीपत वैराळ, बळवंत पगारे, दिलीप वैराळ, राजेंद्र गुजर, नवनाथ गोरे, सोपान जाधव, दिपक पाटोळे, अशोक भगत, जयवंत मंडलिक, अमोल वैराळ, सुनील वैराळ, बाळू पगारे, परिघाबाई खोडके, मंगल गोरे, विजय आहेर, बाळासाहेब शिंदे तसेच जगन गोरे, ज्ञानेश्वर हाळनोर, बाजीराव मंडलिक, बाबासाहेब मंडलिक, भाऊसाहेब खोडके, विठ्ठलराव गुजर, भाऊसाहेब गोरे, दामोदर वैराळ, तुकाराम खोडके, भाऊसाहेब मोकळ, शरद शिंदे, हरिनाना पगारे, प्रकाश रणधीर, रविंद्र गुजर, दिगंबर वैराळ, बाळासाहेब आहेर, दत्तात्रय मंडलिक, शरद गुजर, विश्वंभर वैराळ, देवराम वैराळ, उपकार्यकारी अभियंता प्रशांत वाकचौरे, शाखा अभियंता दिलीप गाडे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page