सोसायटयामार्फत इलेक्ट्रीक वाहन कर्जसुविधासाठी प्रयत्न करू-विवेक कोल्हे
Let’s try for electric vehicle loan facility through the society – Vivek Kolhe
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 18 June, 17.30
By
राजेंद्र सालकर
कोपरगांव : इलेक्ट्रीक वाहन घेण्यासाठी कर्जपुरवठा व्हावा अशी मागणी असंख्य सभासद शेतकऱ्यांनी केली असून भविष्यात त्यादृष्टीने जाणिवपुर्वक प्रयत्न करू असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी शुक्रवारी येसगाव येथे सदस्यांच्या सत्कार प्रसंगी केले .
प्रारंभी दिपक चौधरी यांनी प्रास्तविक केले. साहेबराव रोहोम, रविंद्र आगवण, चंद्रभान रोहोम यांची यावेळी भाषणे झाली.
याप्रसंगी साहेबराव कदम, निवृत्ती बनकर, विश्वासराव महाले, वेणुनाथ बोळीज, सुनिल देवकर, नवनाथ आगवण, बापू सुराळकर, दिनेश कोल्हे, दगुराव चौधरी, अतुल सुराळकर, गोरख आहेर, भिमराव भुसे, शिवाजीराव कदम, दगडु दरेकर, यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी सहकारी, सरपंच उपसरपंच, सोसायटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष, संचालक, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, स्व. शंकरराव कोल्हे, बिपीन कोल्हे व स्नेहलता कोल्हे यांनी शासन कडुन रस्ते, वीज, पाणी आरोग्य आदि विकास कामांसाठी कोटयावधी रूपयांचा निधी आणुन ती मार्गी लावली. संजीवनी उद्योग समुहाने राज्यात सर्वप्रथम पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहिम धडकपणे हाती घेत त्यातुन भुगर्भातील जलसाठा वाढविण्यांवर भर दिला. तुटीच्या खोऱ्यात पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेला आणण्यासंदर्भात माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांचे स्वप्न लवकरच साकार होईल यासाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यासह जलक्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचा पाठपुरावा सुरू आहे.केंद्र व राज्य शासनांच्या विविध योजना थेट ग्रामपंचायत स्तरावर येत असल्याने सरपंच, उपसरपंच, सदस्यांनी आपापल्या गावांची कामगिरी नावलौकीकास्पद कशी होईल यासाठी प्रयत्न करावे असेही ते म्हणाले. साहेबराव रोहोम यांनी आभार मानले.





