कोपरगाव बसस्थानक लगतच्या गाळ्यांसाठी १४ कोटी मंजूर – ना. आशुतोष काळे
14 crore sanctioned for Kopargaon bus stand – no. Ashutosh Kale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun 19 June, 17.00
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : बस आगार इमारत पुनर्बांधणी व स्थानकालगत व्यापारी गाळयांसाठी तब्बल १४ कोटी निधी मंजूर झाला असल्याची माहिती ना. आशुतोष काळे यांनी दिली.
महाविकास आघाडी सरकारकडून कोपरगाव शहरासाठी २६८ कोटी निधी आणला आहे. कोपरगाव शहराचा अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी १३१.२४ कोटी निधी ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी दिला आहे. त्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. रस्त्यांची झालेली दुरवस्था त्यामुळे बाजारपेठेवर परिणाम होवून बाजारपेठेला आलेली मरगळ याची दखल घेऊन शहरातील रस्ते व सुशोभीकरणासाठी देखील कोट्यावधी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे विकासाच्या बाबतीत कोपरगाव शहर शहराचे रूपडे बदलू लागले आहे. कोपरगाव बस स्थानकात व्यापारी संकुल उभारले जाऊन स्थानिकांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू होता.
त्याबाबत विधिमंडळाच्या अधिवेशनात त्यांनी प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले होते. त्यावेळी परिवहन मंत्री ना. अनिल परब यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला होता. एप्रिल महिन्यात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजित पवार कोपरगाव दौऱ्यावर आले असता त्यांनी निधी देण्याची ग्वाही ना. आशुतोष काळे यांना दिली होती. दिलेला शब्द अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांनी पूर्ण करून कोपरगाव शहर बस आगार इमारत पुनर्बांधणी व बस स्थानकालगत व्यापारी संकुल उभारण्यासाठी १४ कोटी निधी मंजूर केला आहे.
त्याबद्दल ना. आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,परिवहन मंत्री ना. अनिल परब, परिवहन राज्यमंत्री ना.सतेज पाटील यांचे आभार मानले आहे. बस आगार इमारत पुनर्बांधणी व बस स्थानकालगतच्या गाळयांसाठी १४ कोटी निधी मंजूर करून आणल्याबद्दल व्यापारी संघटनांनी ना. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.
चौकट
ना. आशुतोष काळे यांच्या भगीरथ प्रयत्नातून कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे, शहरात नवीन रस्ते तयार झाल्याने आठ दिवसाआड पाणी, रस्त्याची दुरावस्था धुळीचे साम्राज्य असलेले धुळगाव, अतिक्रमित टपऱ्यांचे शहर ही कोपरगावची ओळख पुसली जात असल्याचा दावा काळे समर्थक यांच्या कडुन केला जात आहे.