निळवंडेच्या पाण्याला खो घातल्याचे पाप धुवून टाका – विवेक कोल्हे

निळवंडेच्या पाण्याला खो घातल्याचे पाप धुवून टाका – विवेक कोल्हे

Wash away the sin of losing the water of Nilwande – Vivek Kolhe

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun 19 June, 17.20
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : निळवंडेचे पाणी कोपरगांव शहराला येणार होते, मात्र त्याला खो घालण्याचे पाप सत्ताधारी आमदाराने केले असल्याचा आरोप करून अजूनही वेळ गेलेली नाही केलेले पाप धुऊन टाका असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांचे नाव न घेता औद्योगिक वसाहत अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी शनिवारी चासनळी येथे नवनिर्वाचित सोसायटी व ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कारप्रसंगी केले.

विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, दोन्ही साखर कारखाने तालुक्याच्या कामधेनु आहेत हे खरे असले तरीही तरुणांना रोजगार मिळावा यासाठी सावळीविहीर-संवत्सर येथील शेती महामंडळाच्या जमिनी चे ७/१२ उतारे काढून मतदार संघात मोठी औद्योगिक वसाहत सुरु करण्यासाठी उद्योग मंत्र्याकडे प्रस्ताव दिलेला आहे. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी अभ्यासूवृत्तीने सात दशके येथील पाणी, उस शेती व त्यावर अवलंबुन असणारी तालुक्याची अर्थव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी सातत्यांचे प्रयत्न केले. तर तिकडे तत्कालीन आमदारांनी २००५ च्या समन्यायी पाणी वाटपाच्या कायद्याने गोदावरीचा ओव्हरफ्लो बंद केला, येथील शेती उध्वस्त झाली.संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी येथील प्रत्येकाच्या समस्या, दुःख जाणुन घेऊन त्याच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करत  आहेत. केंद्रात पंतप्रधान मोदी, सहकारमंत्री अमित शहा, नितीन गडकरी कार्यरत असुन त्यांच्याकडून कोपरगांवच्या प्रलंबित समस्या सोडविण्यांचे काम सुरु आहे.

प्रारंभी कोल्हे कारखान्याचे संचालक मनेष गाडे, विलास वाबळे यांनी स्वागत केले. अशोकराव भाकरे यांनी प्रास्तविक केले. माजी संचालक भास्करराव तिरसे, चंद्रकांत चांदगुडे संजय बोडखे, गोरक्षनाथ कोकाटे, सचिन वाबळे, कैलास माळी, बापू गाडे यांची यावेळी भाषणे झाली. याप्रसंगी संचालक राजेंद्र कोळपे, नरहरी तिरसे, संभाजीराव गावंड, अशोक माळी, राहुल वाणी, कल्याणराव चांदगुडे, शरद गडाख, सोपानराव कासार, शिवाजीराव घुमरे, सतिष बोरावके, प्रकाश वाघ, सुरेगांव पंचक्रोशीतील सर्व सोसायटी, ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते आदि उपस्थीत होते.मनेष गाडे यांनी आभार मानले.

चौकट

येथील शेती उध्वस्त होत चालली आहे . त्यात आज अन्य तालुके दारणेच्या पाण्यावर हक्क सांगुन येथील शेती व गोदावरी कालवे उजाड करत आहे. मात्र येथील लोकप्रतिनिधी फक्त बढ़ाया मारण्यात पटाईत असुन फोटोसम्राट आमदार म्हणून मिरवत आहे. अशी टिका केली. 

Leave a Reply

You cannot copy content of this page