कोपरगाव बस डेपोत कोठे होणार १४ कोटींचे दुमजली व्यापारी संकुल
Where will the 14 crore double storey commercial complex be located at Kopargaon bus depot?
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon 20 June, 17.40
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : कोपरगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सुमारे अडीच तीन एकर जागेवर जिल्ह्यातील आधुनिक बसस्थानक बांधण्याचे काम पूर्ण झाले असून . हे आकर्षक बसस्थानक नागरिकांच्या सेवेत दाखल झाले आहे. आता कोपरगाव बस डेपोच्या जागेत १४ कोटींचे दुमजली व्यापारी संकुल उभारण्यास मंजुरी मिळाली आहे. पण ते कोठे होणार याची उत्सुकता मात्र कोपरगावकरांसाठी चर्चेचा विषय बनला आहे.
सेना-भाजप युतीच्या काळात तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या प्रयत्नातून हे आकर्षक बसस्थानक २४ ते ३० महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर नागरिकांच्या सेवेत दाखल झाले आहे. यात मुख्य इमारतीत चौकशी कक्ष, तिकीट, पासधारक, रोकड विभाग, चालक व वाहक, विश्रांती कक्ष, विश्रामगृह, पिण्याचे शुद्ध पाणी, दोन सुलभ शौचालये, स्वच्छतागृहे, पोलिस कक्ष, हिरकणी कक्ष, आगनियंत्रणासाठी हजारो लिटरची पाण्याची स्वतंत्र टाकी, भूमिगत गटार व विजवहिन्या, सुखकर आसनव्यवस्था, पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था आदी सुविधा करण्यात आल्या आहेत.
कोपरगाव बस डेपोची जागा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने दिवसभरात येथे हजारो प्रवाशांची व शेकडो बसची वर्दळ असते. अशा गजबजलेल्या ठिकाणी व्यापारी गाळे झाल्याने व्यावसायाला मोठी चालना मिळणार आहे. यासंदर्भात बस आगार इमारत पुनर्बांधणी व स्थानकालगत व्यापारी गाळयांसाठी तब्बल १४ कोटी निधी मंजूर झाला असल्याची माहिती ना. आशुतोष काळे यांनी दिली आहे. तशा बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र हे गाळे नेमके कोठे होणार ? याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता असल्याने यावर मात्र उलट सुलट चर्चा सुरु होती. यासाठी आमच्या प्रतिनिधीने संबंधित प्रश्नाबाबत नामदार आशुतोष काळे यांच्या संपर्क कार्यालयाशी संपर्क साधला असता संपर्क कार्यालयाकडून सदरचे दुमजली व्यापारी संकुल बस स्थानक डेपो च्या पश्चिम बाजूला नैऋत्य कोपऱ्यातील जागेत होणार असून बस डेपो एसटी वर्कशॉप एका बाजूला करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली .
कोट





