दिलासा : सुरेगावात संपर्कातील फक्त १ जण पॉझिटिव्ह ; ८३ जण निगेटिव्ह,
सुरेगावसह पंचक्रोशीत दहा दिवसांची टाळेबंदी
रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट (आरडीटी) द्वारे अवघ्या सहा तासात ८४ जणांची तपासणी,
कोपरगाव कोरोना अपडेट : १७ जुलै २०२० / ३४४ तपासण्या, २४ जण कोरोना ग्रस्त, १२ जण कोरोनामुक्त, तर एका महिलेचा मृत्यू ,११ कोरोना ग्रस्तावर उपचार सुरू, ३०८ अहवाल निगेटिव्ह,
वृत्तवेध ऑनलाईन | 17 July 2020,
By: Rajendra Salkar
कोपरगाव : तालुक्यातील सुरेगाव येथील संपर्कातील ८४ जणांची शुक्रवारी रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट करण्यात आली यात फक्त एक ४५ वर्षांची महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला असून उर्वरित ८३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती कोपरगाव तालुका ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना डॉ. कृष्णा फुलसौंदर म्हणाले, सुरेगाव येथे आठ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या संपर्कातील सुमारे ८४ जणांचा रोगनिदानाचा वेग वाढविण्यासाठी एस. एस. जी. एम. कॉलेज कोपरगाव येथील कोविड सेंटरमध्ये शुक्रवारी (१७ जुलै) रोजी सकाळी ११ ते ५ या वेळेत रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट (आरडीटी) चा करण्यात आले. त्यामुळे या सर्वांची तपासणी अवघ्या सहा तासात पूर्ण झाली यात केवळ ४५ वर्षाच्या एकाच महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला व इतर ८३ अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या एस. एस. जी. एम. कॉलेज मधील कोवीड सेंटर मध्ये ११ कोरोना ग्रस्तावर उपचार सुरु आहेत. असेही डॉ. फुलसौंदर यांनी सांगितले.
दरम्यान कोवीड सेंटर मध्ये ५० जण होम क्वॉरंटाईन असल्याने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाटे कोपरगाव ग्रामीण वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे (आव्हाड) रुग्णांवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान लोकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहनही आरोग्य प्रशासनाने केले आहे.
मा.तहसीलदार.योगेश चंद्रे, कोपरगाव.पोलिस निरीक्षक अनिल कटके, गटविकास अधिकारी यांच्या आदेशानुसार कोळपेवाडी, कोळगावथडी, सुरेगाव, शहाजापूर व वेळापूर. कोरोना रोगांचा प्रादुर्भाव या परिसरामध्ये वाढत असल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी (दि.१८ जुलै ते दि.२७ जुलै ) या काळात वरील गावामधील अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व प्रकारचे दुकाने १०दिवस पूर्णपणे बंद राहतील. याची सर्व दुकानदार व नागरिकांनी नोंद घ्यावी. प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन पोलिस पाटील, सरपंच कोरोना समिती शहाजापूर यांनी केले आहे.
दरम्यान करंजी येथील कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कात आलेल्या १४ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या अहवालाची प्रतीक्षा असून या १४ जणांना कोपरगाव कोवीड सेंटर येथे ठेवण्यात आले आहे .
चौकट
रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट (आरडीटी)
कीटच्या माध्यमातून मोठ्या जनसमुहाची तपासणी करणे योग्य ठरू शकते. त्यातून त्या शहरात रोगाचा प्रसार किती, कुठे आणि कुणाला झाला आहे याबरोबरच त्याचा कल समजण्यास मदत होते.