महर्षी स्कुल ने राखली शत – प्रतिशत निकालाची परंपरा कायम
१० वीची धनश्री बेलदार गणित कट टू कट १०० पैकी १००
१२ वी देवेद्र जांगीड फिजिकल एज्युकेशन कट टू कट १०० पैकी १००
वृत्तवेध ऑनलाइन 17 July 2020
By: Rajendra Salkar
कोपरगाव : केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड नवी दिल्लीचा सी.बी.एस.ई. बोर्डचा निकाल नुकताच जाहीर झाला असुन यामध्ये कोकमठाण येथील संत जनार्दन स्वामी महाराज महर्षी स्कुल ने शत प्रतिशत १००% निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
यावर्षी महर्षी स्कुलची १४ व्या बॅचचे सर्वाधिक ८४ विद्यार्थ्यानीं परिक्षा दिली व १०० % निकालासह उत्तीर्ण झाले. प्रथम येणा-या विद्यार्थीनीने ५०० पैकी ४८५ गुण (९७%) मिळवले व तालुक्यात प्रथम येणाचा मान मिळविला.
इ.१० वी ची १४ वी बॅच असुन इ. १२ वी ची ९ वी बॅचच्या विद्यार्थ्यानी घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यार्थ्याचे परिश्रम व शिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन यामुळे शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यानी नेत्रदिपक यश मिळविले आहे. गेल्या २२ वर्षापासुन गुणवंत विद्यार्थी घडविणे हेच विद्यालयाचे ध्येय असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहनराव चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगीतले.
इ. १० वी तालुक्यात प्रथम क्रमांक कु. धनश्री राजेंद्र बेलदार (९७%)
द्वितीय अनुजा सुनिल आभाळे (९५.४०%),तृतीय श्रेया अजय लोढें (९५.२०%), तृतीय अथर्व महेष काळे (९५.२०%), चतुर्थ क्षितीज दत्तात्रय कानडे (94%)पाचवा विनायक अविनाश शिंदे (९२.४०%),पाचवा यश सुनील डांगे (९२.४०%),
इ. १२ वी सायन्स
प्रथम ऋत्वीक दिनेश कोल्हे (८१%),
द्वितीय तेजश्री शामराव गुरसळ (८०%),
द्वितीय देवेद्रं सुरेष जागींड (८०%),
तृतीय सोनल विलास गोंदकर (७४.२०%),
12 वी काॅमर्स
प्रथम सिध्दांत रविद्रं भनगे (७८%),
द्वितीय रूची महेष प्रेमानी (७५%),
तृतीय दिया राजेश गिगना (७३.४%),
इ. १० वी मध्ये ५ विद्यार्थी (९५%) प्लस , १३ विद्यार्थी ९०% प्लस ३९ विद्यार्थी, ८५% प्लस,
इ. १० वी ची धनश्री बेलदार हिने गणितात १०० पैकी १०० गुण मिळविले आहे. तर इ. १२ वी मध्ये देवेद्र जांगीड याने फिजिकल एज्युकेशन या विषयात १००पैकी १०० गुण मिळविले आहे. तसेच संस्कृत, सामाजिक शास्त्र, इंग्रजी या विषयांमध्ये १०० पैकी ९९ गुण मिळविले आहेत. अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र पानसरे यांनी दिली. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष मोहनराव चव्हाण प.पु. रमेशगिरी महाराज, सर्व विश्वस्त यांनी अभिनंदन केले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य राजेंद्र पानसरे, पर्यवेक्षिका सौ. जे.के. दरेकर, जयप्रकाश पाण्डेय, मेघराज काकडे, स्वप्निल पाटील, बाळासाहेब बढे, डाॅ. रविंद्र कोहकडे, राहुल काशिद, शिवप्रसाद घोडके, कैलास कुलकर्णी, सौ. अनिता वरकड, सौ निकीता गुजराथी आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.