विधानपरिषद निवडणुकीत फडणविसांची चाणक्यनिती जिंकली -सौ स्नेहलता कोल्हे
Chanakyaniti of Fadnavis won in the assembly elections – Mrs. Snehalta Kolhe
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 21 June, 17.00
By
राजेंद्र सालकर
कोपरगांव : सत्ता आज आहे उद्या नाही मात्र जनता जनार्दन आपल्याबरोबर असल्याने त्यांच्या अडी-अडचणी सोडविणे हाच मुलमंत्र भारतीय जनता पक्ष नेतृत्वाने दिला असल्याने विधानपरिषद निवडणुकीतही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांची चाणक्यनिती जिंकली अशा शब्दात भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी विधान परिषद निवडणूकीचा आनंदोत्सव कोपरगांव शहर व तालुका भाजपाच्यावतीने साजरा करताना अशी प्रतिक्रिया दिली.
स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की, देशाचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कठीण परिस्थीतीत भारत देशाला एकसंघ ठेऊन प्रगती साधण्याचे कसब पार पाडत आहेत, त्यांच्या मातोश्रींचा शतकोत्तर महोत्सव सर्वत्र साजरा होत असतांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधानांना प्रविण दरेकर, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रा. राम शिंदे आणि प्रसाद लाड यांना विधानपरिषदेच्या अटीतटीच्या निवडणुकीत विजयी करून मोदींना आईच्या वाढदिवसाची आगळीवेगळी भेट दिली हा विजयोत्सव पंतप्रधानांच्या मातोश्रींना समर्पित करून भारतीय, जनता पक्ष संघटन आणखी मजबुत करावे असेही सौ. स्नेहलता कोल्हे म्हणाल्या.
विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भल्या भल्यांना व राजकारणात मुरब्बी असलेल्यांना राज्यसभा निवडणुकीनंतर विधान परिषदेत भाजपाचे पाचही शिलेदार निवडुन आणुन चांगलीच चपराक मारली आहे. अति आत्मविश्वास आणि अहंकाराचा त्यांनी पर्दाफाश केला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे पूर्वसंध्येला हा भाजपाचा विजय म्हणजे विश्वव्यापी आनंद आहे असेही सौ. स्नेहलता कोल्हे शेवटी म्हणाल्या., या विजयात ज्यांनी ज्यांनी मोलाचे सहकार्य केले ते सर्व व निवडून आलेले उमेदवार अभिनंदनास पात्र आहे.