सौ. सुशिलामाई काळे महाविद्यालयास नॅककडून ‘बी’ ग्रेड

सौ. सुशिलामाई काळे महाविद्यालयास नॅककडून ‘बी’ ग्रेड

 ‘B’ grade from NAC to Sushilamai Kale College

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 21 June, 17.30
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : सौ. सुशिलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास नुकतीच नॅक (NAAC) समितीने मूल्यांकनासाठी भेट दिली होती. महाविद्यालयाच्या सर्व पायाभूत सुविधा शैक्षणिक सुविधांची तपापसणी करून महाविद्यालयाला पहिल्याच प्रयत्नात ‘बी’ ग्रेड मिळविण्यात यश आले आहे अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. विजया गुरसळ यांनी दिली आहे.

देशातील महाविद्यालयांचे राष्ट्रीय स्तरावर मुल्यांकन करून व शैक्षणिक कामकाजाच्या दर्जाचे निरीक्षण करून गुणवत्तेचे प्रमाण ठरवणाऱ्या संस्थेच्या नॅक (NAAC) समितीने सौ. सुशिलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची मागील आठवड्यात दि. १५ व १६ जून  रोजी तपासणी केली होती.

महाविद्यालयाची तपासणी करून उपलब्ध शैक्षणिक, पायाभूत सुविधा, विद्यार्थी, पालकांचे अभिप्राय व इतर बाबींची सखोल परिक्षण करून त्यानुसार महाविद्यालयास 2.33  CGPA   गुण देऊन ‘बी’ श्रेणी प्रदान केली आहे.  संस्थेचे अध्यक्ष मा. आ.अशोक काळे व्हा. चेअरमन छबुराव आव्हाड,  विश्वस्त ना. आशुतोष काळे,  सचिव सौ. चैताली काळे, जॉईंट सेक्रेटरी सौ. स्नेहलता शिंदे, महाविद्यालय विकास समितीचे विविध पदाधिकारी आदींनी महाविद्यालयाचे विशेष कौतुक केले आहे. प्राचार्या डॉ. सौ. विजया गुरसळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक  प्रा. विनोद मैंद, त्याच बरोबर सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक तसेच प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले त्यामुळे NAAC मानांकन प्राप्त झाल्याने महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page