कोपरगाव पिपल्स बँकेत मोबाइल बँकिंग सेवा सुरू -मुंदडा

कोपरगाव पिपल्स बँकेत मोबाइल बँकिंग सेवा सुरू – मुंदडा

Kopargaon People’s Bank launches mobile banking service – Mundada

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 25 June, 17.30
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : अहमदनगर जिल्ह्यातील नावाजलेल्या कोपरगाव पिपल्स बँकेकडुन नुकतीच आपल्या ग्राहकांच्या सेवेकरिता मोबाइल बँकिंग सुविधा सुरुवात करण्यात आली आहे अशी माहिती चेअरमन सत्येन मुंदडा यांनी दिली

कोपरगाव पीपल्स बॅंकेने नुकतीच नवीन संगणक प्रणाली विकसित केली असून केंद्र सरकारच्या डिजिटल धोरणानुसार आपल्या खातेदारांकरिता ही डिजिटल बँकिंग सुविधा देण्याच्या उद्देशाने आणखी एक पाऊल पुढे टाकत ग्राहकांकरिता मोबाइल बँकिंग सुविधा सुरू केली आहे. यामुळे आपल्या मोबाइल वरुन फंड ट्रान्सफर, खाते उतारा, व इतर बँकिंग सेवा मिळणार आहे. 

ग्राहकांना यामुळे बँकिंग सुविधेचा फायदा होणार आहे. ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे चेअरमन सत्येन मुंदडा यांनी संगितले.

 खूप कमी कालावधीत आपल्या बँकेने तंत्रज्ञान क्षेत्रात भरीव प्रगती केली आहे असे कैलासशेठ ठोळे यांनी सांगितले. 

लेखा परीक्षक परीक्षित भदादे, कौशल मुंदडा चार्टड अकाऊंट, चेअरमन सत्येन मुंदडा व संगणक समिती चेअरमन रविंद्र ठोळे, व्हा.चेअरमन प्रतिभा शिलेदार, संचालक कैलासचंद ठोळे, डॉ. विजय कोठारी, सुनील कंगले , कल्पेश शाह, अतुल काले , धरमचंद बागरेचा,हेमंत बोरावके, सुनील बंब, राजेंद्र शिंगी , वसंतराव आव्हाड, यशवंत आबनावे, संदीप रोहमारे, प्रभावती पांडे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक एकबोटे , संगणक विभाग प्रमुख चंद्रशेखर व्यास , गणेश काळे, सदाशिव धारणगांवकर आदी बँकेचे सर्व संचालक व सर्व सेवक वर्ग उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी निखिल निकम यांनी आभार मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page