आत्मनिर्भर कोपरगाव: व्यापारी महासंघाची कार्यकारीणी

कोपरगाव:
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत ‘करण्याची घोषणा केली. अशाच धर्तीवर ‘आत्मनिर्भर कोपरगाव’ या संकल्पनेच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्यातील व्यवसाय व्यापारास प्रोत्साहन देऊन तसेच कोपरगाव तालुक्यातील नागरिकांना स्थानिक बाजारपेठेतूनच माल खरेदी करण्याचे आवाहन करत कोपरगावची बाजारपेठ फुलवण्याचा कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचा निर्धार असल्याची घोषणा कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी केली.

कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाची विस्तारित कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. कार्याध्यक्ष म्हणुन भुसार मालाचे व्यापारी सर्वश्री अजीत लोहाडे, किराणा व्यापारी सुधीर डागा तर उपाध्यक्ष म्हणून कोपरगाव तालुका किराणा मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष मोहनलालजी झंवर, साखर व्यापारी राजेंद्र बंब, चहा व्यापारी नारायणशेठ अग्रवाल तर ड्रीप इरिगेशनचे निर्माते केशवराव भवर यांची निवड करण्यात आली. खजिनदार पदी खुबाणी ज्वेलर्स चे तुळशीदास खुबाणी तर सचिवपदी बिल्डींग मटेरिअल सप्लायर्स प्रदीप साखरे, सहसचिव पदी इंडस्ट्रीयालिस्ट नरेंद्र कुर्लेकर व फर्टीलायझरचे व्यापारी राम थोरे यांची निवड करण्यात आली.

या प्रसंगी कार्याध्यक्ष सुधीर डागा म्हणाले ,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत तीन महिने असलेल्या लॉक डाऊन चे कालावधीत कोपरगाव तालुक्यातील सर्व लहान मोठ्या व्यापाऱ्यांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी न करता कोरोना योद्ध्याप्रमाणे प्रशासनास सहकार्य करण्याची भूमिका घेतली व्यापाऱ्याचे देखील नुकसान होणार नाही याची काळजी घेतली. कोपरगाव तालुक्यात घरगुती व मध्यम स्वरूपाचे उद्योग सुरु करण्यासाठी व्यापारी महासंघ यापुढे प्रयत्न करणार आहे.

तसेच महीला बचत गटांना घरगुती उद्योग उभारण्यासाठी समता पतसंस्थेच्या माध्यमातून अल्प व्याजदराने कर्जपुरवठा देखील करणार असल्याचे उपाध्यक्ष मोहनलाल झंवर यांनी जाहीर केले.

‘महानगरांपेक्षा कमी दरात व थेट तुमच्या दारात’ या तत्वानुसार
बाजारपेठ फुलविण्याच्या व्यापाऱ्यांच्या प्रयत्नांना साथ द्यावी असे आवाहन उपाध्यक्ष नारायण अग्रवाल यांनी केली.

सचिव प्रदीप साखरे म्हणाले कि, स्थानिक बाजारपेठेतील खरेदी पैसा पुन्हा स्थानिक बाजारपेठेतच येणार असल्याने त्यामुळे ग्राहकांनी स्थानिक बाजारपेठच खरेदी करावी.

कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाच्या कार्यकारिणीच्या विस्तारात खालील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये ग्रामीण भागाला देखील प्राधान्य देण्यात आले. धारणगाव रोड शाखा प्रतिनिधी पदी सर्वश्री गुलशन होडे-धारणगाव रोड, राजेश खैरे-रवंदा, कोळपेवाडी-राजूशेठ गोलेचा व श्री.भळगट, वारी-बाबुशेठ कलंत्री, श्री.लालवाणी, पोहेगाव-डी.आर. औताडे, सागर मखीजा, शिरसगाव-विनोद भागवत, शिंगणापूर-दिलीप धाडीवाल, राजू कुऱ्हे, चासनळी-रविराज चांदगुडे, निळकंठ चांदगुडे, जेऊर कुंभारी-नितीन शिंदे, धामोरी-आबा भाकरे, अमर माळी, येसगाव-राहूल गायकवाड, वैभव भंडारी यांची तर संचालक पदी सर्वश्री आशुतोष पटवर्धन, रमेश शिरोडे, केशवराव साबळे, कृष्णाशेठ उदावंत, सतीष पांडे, संजय भन्साळी, योगेश बागुल, चंद्रकांत नागरे, चेतन खुबाणी, टिलक अरोरा, सत्येन मुंदडा, बबलू राजपाल, बबलूशेठ वाणी, उमेश धुमाळ, रामू पटेल, हेमचंद्र भंवर, सचिन ठोळे, सुमित भट्टड, सतीश कोतकर, किरण शिरोडे, अबुजर शेख, संजय दुशिंग व नसीर सय्यद यांची निवड करण्यात आली

Leave a Reply

You cannot copy content of this page