कोपरगाव नगरपालिका प्रारूप मतदार यादीवर ३५० हरकती
350 objections on Kopargaon Municipal Model Voter List
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 28 June, 16.00
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या मतदार यादी कार्यक्रमानुसार कोपरगाव नगरपालिकेने २१ जुन रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द केली आहे.या प्रसिद्ध झालेल्या यादीवर नागरिकांच्या साधारण ३५० हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत.अशी माहिती नगरपालिका मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
राज्य निवडणूक आयोग यांचे पत्रान्वये कोपरगाव नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -२०२२ मतदार यादीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला आहे. त्यानुसार सोमवारी १३ जून २०२२ रोजी कोपरगाव नगरपालिका येथे आरक्षण सोडत काढण्यात आली . १५ ते २१ जून २०२२ या कालावधीत नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. प्रसिध्द केलेल्या प्रारूप मतदार यादीवर नागरिकांच्या एकूण ३५० हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत. यात प्रामुख्याने नावे वगळले . दुबार, मृत, स्थलांतरित नावे वगळली जावीत अशा परंतु हिम मतदार यादी तयार करण्याचे काम महसूल यंत्रणेचे असल्यामुळे पालिकेला यात कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करता येत नाही असे मुख्याधिकारी गोसावी यांनी सांगितले. चतु:सीमा मुळे काही प्रभागांमधील नागरिकांची नावे तिकडे तिकडे झाली असतील तर या प्रभागात त्यात टाकावी अशा हरकती व सूचना आल्या होत्या परंतु एकमेकांच्या सीमालगत असलेल्या प्रभाग अंतर्गतच हा फेरबदल होऊ शकतो मात्र दोन नंबर प्रभागातील नावे थेट ७ नंबर प्रभागात टाकावे असे होणार नाही असेही त्यांनी सांगितले. परंतु सीमारेषेचे लगत असलेल्या प्रभागातील नावे इकडेतिकडे झाले असतील तरच ती दुरुस्ती करता येते असेही त्यांनी सांगितले. आरक्षणाची अंतिम अधिसूचना १ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल, .