संजीवनीच्या सिव्हिल व मेकॅनिकल विभागास पुन्हा एनबीए मानांकन – अमित कोल्हे
Sanjeevani’s Civil and Mechanical Department Re-NBA Rating – Amit Kolhe
फेर मानांकनामुळे दर्जा आणि गुणवत्तेवर शिक्कामोर्तब Re-rating seals the quality and merits
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 7 July, 18.00
By
राजेंद्र सालकर
कोपरगांवः संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हिल इंजिनिअरींग व मेकॅनिकल इंजिनिअरींग या दोन विभागांना नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडिटेशन (एनबीए), नवी दिल्लीने पुन्हा पुढील तीन वर्षांसाठी मानांकन बहाल करून संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दर्जा आणि गुणवत्तेवर शिक्कामोर्तब केले आहे. अशी माहिती मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी दिली. यामुळे संजीवनी ही उत्तर महाराष्ट्रातील ऑटोनॉमस दर्जा असलेली एनबीए मानांकन प्राप्त एकमेव संस्था ठरली आहे असेही ते म्हणाले.
या अभुतपुर्व उपलब्धीबाबत संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे यांनी डायरेक्टर डाॅ. ए.जी. ठाकुर, विभाग प्रमुख डाॅ. एम. एस. पुरकर, डाॅ. एम. व्ही. नागरहल्ली, डाॅ. ए. एस. सय्यद व श्री के. एम. भावसार यांचे अभिनंदन करून नितिन कोल्हे यांनी या सर्वांचा छोटेखानी सत्कार केला.
अमित कोल्हे यांनी म्हटले आहे की संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली २००३ साली एनबीएच्या कसोटीला सामोरे जाणारे संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय हे ग्रामिण महाराष्ट्रातील एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय होते. तेव्हापासुन सर्वच पात्र विभाग मानांकन प्राप्त ठरले आहेत. सिव्हिल इंजिनिअरींग व मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागांनी मागील तीन वर्षातील प्रत्येक विभागातील प्रवेश संख्या, पी.एच.डी. असणारे शिक्षक , विद्यार्थी-शिक्षक प्रमाण, प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या सलग चार वर्षात उत्तिर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे वाढते प्रमाण, उच्च शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी आणि संस्थेच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये मिळणाऱ्या नोकऱ्यांचे प्रमाण, शिक्षकांनी आधुनिक ज्ञानवृध्दीसाठी पुर्ण केलेले परीसंवाद, सादर केलेले शोधनिबंध व कार्यशाळांची संख्या, कन्सलटन्सी, विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात मिळविलेले प्राविण्य, सुसज्य प्रयोगशाळा , नामांकित कंपन्या व परदेशी विद्यापीठांशी केलेले सामंजस्य करार, अशा अनेक बाबींचा चढत्या कमानीचा अहवाल एनबीए कार्यालयाला सादर केला होता. एनबीए कार्यपध्दतीनुसार एनबीए समितीने दोनही विभागांनी सादर केलेल्या सर्व बाबींची पुराव्यासहीत परीमानांनुसार पडताळणी केली आणि भेटीनंतर लागलीच एका महिन्यात दोनही विभागांना पुढील तीन वर्षांसाठी एनबीए मानांकन बहाल केल्याबाबतचे अधिकृत पत्र दिले. महाराष्ट्रातच नव्हे तर संपुर्ण देशात अनेक अभियांत्रिकी महाविद्यलये आहेत. परंतु फार थोड्या संस्था एनबीए च्या कसोट्यानां सामोरे जाण्याचे धाडस करतात. मात्र महाराष्ट्राच्या ग्रामिण भागातुन आत्मविश्वासच्या जोरावर २००३ पासुन एनबीए च्या कसोट्यांना सामोरे जाण्याचे संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय धाडसी पावुल टाकित आहे.
सध्या आवुटकम बेस्ड एज्युकेशनच्या माणकाप्रमाणे तपासणी करण्यात येते. अतिशय कठीण मानके असलेल्या कसोट्यांना दोनही विभाग सामोरे गेले. आता दोनही विभागाने दर्जा व गुणवत्ता टिकवुन ठेवत पुन्हा तीन वर्षांसाठी मानांकन प्राप्त करून संजीवनीच्या शिरेपेचात मानाचा तुरा खोवला आहे, असे श्री. कोल्हे यांनी शेवटी म्हटले आहे.