माझे नावाचे बनावट ट्विटर अकाउंट हे विरोधकांनी रचलेले षडयंत्र : स्नेहलता कोल्हे
दर्जाहीन राजकारणाची पातळी, निषेधार्थ
वृत्तवेध ऑनलाईन ! 18 July 2020
By: Rajendra Salkar
कोपरगाव : माझ्या नावाने बनावट ट्विटर अकाउंट तयार करून ट्विट केल्याचे प्रकार हे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचे खच्चीकरण करण्यासाठी विरोधकांनी रचलेले षडयंत्र असल्याचा आरोप भाजपच्या प्रदेश सचिव, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केला.
माझ्या नावाने बनावट ट्विटर अकाउंट तयार केल्याचे माझ्या निदर्शनास आले असून त्याद्वारे मी कोणतीही पोस्ट टाकलेली नाही. हे अकाउंट हे बनावट असून त्याबाबत मी सायबर पोलिसांकडे तक्रार दिली. या अकाउंटवरून ट्विट व रिट्विट केले. केल्याचे दिसत असल्याने केवळ मला बदनाम करण्याच्या हेतुनेच केलेले आहे.
या बनावट अकाऊंट द्वारे नागरीकांमध्ये माझ्या भुमिकेविषयी सभ्रम निर्माण केला गेला, ही खेदाची बाब आहे.खोटे नाटे आरोप करण्यासाठी सोशल मिडीयाचा यापुर्वीही सातत्याने वापर केला गेला, परंतु राजकारणाची पातळी सोडून अतिशय दर्जाहीन राजकारण केले जाते, ही गोष्ट निश्चितच निषेधार्ह आहे.