कोपरगाव लहान पुल पाण्याखाली, वाहतूकीसाठी बंद

 कोपरगाव लहान पुल पाण्याखाली, वाहतूकीसाठी बंद

Kopargaon small bridge under water, closed for traffic

गोदावरी २० फुटांवर; तीन दिवसांत १६ फुटांनी वाढGodavari at 20 feet; Increased by 16 feet in three days

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 12July, 18.30
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : इगतपुरी नाशिक धरण क्षेत्रात संततधार पावसामुळे नांदुरमधमेश्वर बंधाऱ्यातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. कोपरगाव
गोदावरी नदीची पातळी झपाट्याने वाढत आहे. आज दुपारी चारच्या सुमारास लहान फुलाला पाण्याने स्पर्श करून पुलावरून पाणी जाऊ लागल्याने नगरपालिका प्रशासनाने खबरदारी घेत मंगळवारी (१२ जुलै) सकाळपासूनच हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवला. येणारे तीन दिवस हवामान खात्याने अति पावसाचा इशारा दिल्यामुळे आपत्कालीन यंत्रणेने यांत्रिक बोट सज्ज ठेवली आहे. पाण्याची वाढती पातळी पाहता रात्रीतून लहान पूल पाण्याखाली गेला आहे.

सायंकाळी गोदावरीची पातळी पातळी २० .८ फुटांवर पोचली होती. दिवसभरात पातळीत १० फुटांनी वाढ झाली. नाशिक व धरण क्षेत्रात गेल्या दोन दिवसाच्या धुवॉंधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पातळीत सुमारे १८ फुटांनी वाढ झाली आहे. त्यामुळे पाणी पात्राबाहेर येऊन नदीघाट पाण्याखाली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात असून . रात्री पाण्याने लहान पुल पूर्ण पाण्याखाली जाण्याची शक्यता असल्याने नगरपालिका प्रशासनाने पूल वाहतुकीसाठी बंद केला. पाण्याचा वाढता वेग पाहून नगरपालिकेची आपत्कालीन यंत्रना सज्ज आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागातील नागरिक प्रापंचिक साहित्यासह सुरक्षितस्थळी स्थलांतर कराव लागणार आहे तर नागरिकांनी नदीच्या जवळ जाऊ नये असे आवाहन तहसीलदार विजय बोरुडे यांनी केले आहे.

चौकट
खबरदारी म्हणून कोपरगाव नगरपालिकेने कोपरगाव शहरातील संत जनार्दन स्वामी सेतू ( लहान पुल ) वाहतुकीसाठी बंद केला आहे तरीही लोक नदीचे पाणी पाहण्यासाठी गर्दी करीत आहे तसेच काही अति उत्साही तरुण सेल्फी काढण्यासाठी पुलावर गर्दी करत आहे मात्र पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page