सहकारात इतिहास घडला ; कोल्हे कारखान्यात २१ जागासाठी अर्जही २१ च निवडणूक बिनविरोध
Cooperation made history; 21 applications for 21 seats in Kolhe factory without any objection
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 13July, 17.00
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे निधनानंतर अवघ्या तीन महिन्यात कारखान्याच्या निवडणुका जाहीर झाल्या संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केलेला आव्हानाला प्रतिसाद देत २१ जागांसाठी २१च अर्ज आल्याने सर्वच सर्व जागा बिनविरोध झाल्या, सहकारी साखर कारखानदारीत २१ जागांसाठी २१ च अर्ज येऊन त्या बिनविरोध झाल्याचा इतिहास घडला आहे असे गौरवौद्गार कोल्हे समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी व्यक्त केले.त्यांनी सर्व सभासदांचे आभार मानले आहे.
निवडून आलेल्या संचालकामध्ये सर्वश्री ज्ञानेश्वर भगवंत परजणे, विश्वासराव नारायणराव महाले, बापूसाहेब संपतराव बारहाते (करंजी गट), बिपीन शंकरराव कोल्हे, विवेक बिपीन कोल्हे, निलेश पथाजी देवकर (ब्राम्हणगांव गट), बाळासाहेब चंद्रभान वक्ते, रमेश रंगनाथ आभाळे, ज्ञानदेव पाराजी औताडे (जेऊरकुंभारी गट), आप्पासाहेब रभाजी दवंगे, राजेंद्र निवृत्ती कोळपे, ज्ञानेश्वर चिलीया होन (कोळपेवाडी गट), मनेष दिनकर गाडे, विलास एकनाथ वाबळे, विलास तुळशीराम माळी (वेळापुर गट), त्रंबकराव निवृत्ती सरोदे (सोसायटी मतदार संघ), सौ. उषा संजय औताडे सौ. सोनिया बाळासाहेब पानगव्हाणे (महिला राखीव मतदार संघ), रमेश दादा घोडेराव (अनुसुचित जाती मतदार संघ ), निवृत्ती कारभारी बनकर (इतरमागासवर्गीय मतदार संघ), सतिष सुभाषराव आव्हाड (विमुक्त भटक्या जाती जमाती मतदार संघ)यांचा समावेश आहे. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) उज्वला गाडेकर तर सहायक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक नामदेव ठोंबळ यांनी काम पाहिले.
बिपीन कोल्हे पुढे म्हणाले की, संजीवनी उद्योग समुहाची मुहुर्तमेढ माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी १९६० च्या दशकात रोवली ग्रामिण अर्थकारणाला दिशा देताना येथील शेतक-यांच्या प्रत्येक अडी अडचणी स्वत: समजुन घेत त्यावर काय उपाय योजना करता येईल याबाबतचा कृती आराखडा आखून त्याची अंमलबजावणी केली. साखर आणि कारखानदारी याची आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालत संजीवनीने सहकाराच्या माध्यमांतुन साखर उत्पादनाबरोबर अल्कोहोल आधारित उपपदार्थ प्रकल्प राबवत राज्यातील साखर पायलट कारखानदारीला आधूनिकतेची दिशा दिली.
स्व. शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली संजीवनीने रासायनिक उपपदार्थ निर्मीतीत नांवलौकीकास्पद कामगिरी करत अन्य उत्पादने तयार करण्यांत मोलाची कामगिरी बजावली आहे. त्याच बरोबर देशात सर्वप्रथम संजीवनीने ज्युस पासुन इथेनॉल उत्पादन सुरू केले आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुकीत सभासद शेतकरी सातत्याने व्यवस्थापनास सहकार्य करतात त्यांच्या आर्शिवादामुळेच सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याची घौडदौड सातत्याने सुरू असुन कारखान्याचा राज्यात नावलौकीक आहे. कारखान्यांस देश व राज्य पातळीवर आजवर २४ विविध पारितोषके मिळालेली आहेत. साखर उत्पादनाबरोबरच अन्य क्षेत्राकडे कारखाना व्यवस्थापनाने अधिक लक्ष देवुन त्यानुरूप ध्येय धोरण आखायला सुरूवात केली आहे.
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक, कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष, कोईमतुर ऊस संशोधन व विकास सोसायटी संस्थेचे उपाध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी स्व. शंकरराव कोल्हे यांच्याकडुन सहकाराचे धडे घेत नवीन पूर्ण कल्पनेतून बीपी दादा कोल्हे यांच्या अभ्यासु मार्गदर्शनाखाली खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या आव्हानाला सहकार क्षेत्राने कसे सामोरे जावे, त्यासाठी काय काय उपाय योजना केल्या पाहिजेत, उस उत्पादक सभासदांना कमी श्रमात कमी खर्चात अधिकचे उत्पादन आणि जास्तीचा साखर उतारा कसा मिळेल याबाबत वेळोवेळी माहिती घेवुन जादा उत्पादन देणारे उस बेणे सभासद शेतक-यांना पुरवुन त्याबाबतचा धडक कृती कार्यक्रम आखला आहे, शिवाय कारखान्याने सहवीज निर्मीती, इथेनॉल, बायोगॅस व त्यातून वीज निर्मिती, विविध रासायनीक उपपदार्थ याबरोबरच औषधी पॅरासिटॉमॉल उत्पादनांत पायलट प्लांट यशस्वी होऊन कार्यवाही सुरू आहे, सभासद, शेतक-यांनी टाकलेल्या विश्वासाला शेवटच्या श्वासापर्यंत पात्र राहुन कारखान्यांच्या नांवलौकीकात आणखी भर घालु असेही ते म्हणाले. कारखाना निवडणुक बिनविरोध पार पाडण्यांत ज्या घटकांनी साथ दिली त्या सर्वांचे त्यांनी शेवटी आभार मानले आहेत. सर्व नवनिर्वाचित संचालकांचे ऊस उत्पादक सभासद, विविध संस्थांच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी, संचालकांनी अभिनंदन केले आहे.
चौकट
सहकारात लहान असो की मोठी निवडणूक म्हटले की उमेदवारांच्या जागेच्या संख्येपेक्षा दुप्पट तिप्पट उमेदवारीसाठी अर्ज दाखल होतात त्यातल्या त्यात साखर कारखानदारी म्हटले की शेकडो उमेदवारी अर्ज भरले जातात त्यानंतर मनधरणी करून समजूत घालून माघारीची प्रक्रिया पार पाडावी लागते परंतु पहिल्यांदाच कोल्हे साखर कारखान्याच्या निवडणुकीत २१ जागांसाठी २१ च अर्ज आले हा सहकार निवडणुकीतील इतिहास घडला आहे.





