छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मासाठी मोठे कार्य केले- महंत रामगिरी महाराज

छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मासाठी मोठे कार्य केले- महंत रामगिरी महाराज

Chhatrapati Shivaji Maharaj did great work for religion – Mahant Ramgiri Maharaj

पोहेगावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरणEquestrian statue of Chhatrapati Shivaji Maharaj unveiled in Pohegaon

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 26July, 17.30
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मासाठी मोठे कार्य केले आहे असे प्रतिपादन करत ग्रामीण भागात पोहेगांव येथे छत्रपतींचा एकमेव पुतळा असल्याने राजे छत्रपती स्मारक समितीचा आदर्श इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल असे गौरवोद्गार महंत रामगिरी महाराज यांनी पोहेगाव येथे राजे छत्रपती स्मारक समितीच्या वतीने बसवण्यात आलेल्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण प्रसंगी व्यक्त केले.

महंत रामगिरी महाराज म्हणाले धर्माला ग्लानी येते तेव्हा भगवंत अवतार घेत असतो. छत्रपती शिवाजी महाराज हे  भगवंताचे शिवाचेच अवतार होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे बसवण्यात देखील हिम्मत लागते.वैजापुर तालुक्यात एकाच वर्षात ५० पुतळे बसवले आहे. कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव ग्रामीण भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा राजे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीने बसवून आदर्श घडवला आहे.छत्रपतीचां पुतळा बसवायला ही धमक लागते ती धमक पोहेगांव मध्ये दिसून येत आहे.

यावेळी स्मारक समितीचे मार्गदर्शक नितिन औताडे, शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते,शारदानंदगिरी महाराज,  सरपंच अमोल औताडे, उपसरपंच प्रशांत रोहमारे, डाऊचचे सरपंच संजय गुरसळ, अभिषेक आव्हाड, ग्रा.प.सदस्य राजेंद्र औताडे, संचालक डी पी औताडे, अशोकराव नवले, गोरक्षनाथ औताडे, एम. टी. रोहमारे, साईनाथ रोहमारे, निवृत्ती औताडे,कचेश्वर डुबे, निवृत्ती शिंदे, दादासाहेब औताडे, रमेश झांबरे, आप्पासाहेब औताडे, अशोकराव औताडे, नानासाहेब औताडे, मधुकर औताडे, राजेंद्र कोल्हे, रमेश औताडे, रावसाहेब औताडे, साहेबराव गोरे, सुदाम मोरे, मधुकर पोटे, दिनकर औताडे, अर्जुन पवार, बाळासाहेब देशमुख, राजेंद्र मोराडे, चांगदेव कांदळकर, रघुनाथ देवडे, गजानन वाघ, प्रकाश औताडे, प्रकाश रोहमारे, निवृत्ती जोंधळे, शंकर वाघ, किशोर वाघ, श्रीहरी घोटेकर, बाबुराव वाघ, नवनाथ पवार, चंद्रकांत औताडे, कारभारी रोहमारे , चांगदेव कांदळकर अदीसह राजे छत्रपती स्मारक समितीचे सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. फटाक्यांची जोरदार आतीश बाजी करत हा अनावरण सोहळा पार करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराजांची आरती घेऊन महंत रामगिरी महाराजांनी सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांची महती सांगितली. शिवसेनेच नितीन औताडे यांच्या हस्ते रामगिरी महाराजांचे संत पुजन करण्यात आले. शेवटी सर्वांचे आभार सरपंच अमोल औताडे यांनी मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page