कोपरगाव शहरात संजीवनी सैनिकी स्कूलचे कारगिल दिनी संचलन
Operation of Sanjivani Military School in Kopargaon on Kargil Day
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir 29July, 18.10
By
राजेंद्र सालकर
कोपरगांव: मंगळवारी (२६जुलै) कारगिल विजय दिनानिमित्त संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनिअर काॅलेजच्या छात्रांनी कोपरगाव शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मुख्य रस्त्यावर शानदार संचलन केले, व संजीवनी इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त सुमित कोल्हे यांचे प्रमुख उपस्थित एअर रायफल्स द्वारे शहिद जवानांना सलामी दिली. यावेळी अमर जवान स्मारकावर सुमित कोल्हे यांनी पुष्पचक्र वाहुन श्रध्दांजली अर्पण केली.
संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनिअरच्या छात्रांमध्ये राष्ट्रप्रेम जागृती निर्माण व्हावी, शहिदांप्रती आदरयुक्त भावना असावी, देश वासीयांनी प्रेरणा मिळावी, याच हेतुने सैनिकी स्कूलच्या पुढाकरातुन हा भावस्पर्शी कार्यक्रम ठरला.
यावेळी सुमित कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून त्यांचे प्रती आदर व्यक्त केला.
यावेळी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष युवराज गांगवे, उपाध्यक्ष मारूती कोपरे, माजी सैनिक प्रकाश राणा, विजय भास्कर, खिलारे एस.डी., मुरडणर एन.बी. मुळेकर व्ही. एच., कोल्हे ए.एम., स्वच्छता दुत सुशांत घोडके, उपप्राचार्य के. एल. दरेकर, पांढरे एस. वाय. जिरे के.पी. आदी उपस्थित होते. फोटो ओळी: संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनिअर काॅलेजच्या वतीने कारगील विजय दिवसाच्या निमित्ताने शहिद जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी सुमित कोल्हे, तसेच माजी सैनिक उपस्थित होते.