पाट पाण्यासाठी संघर्षाची तयारी ठेवा- विवेक कोल्हे
Be prepared to fight for drinking water – Vivek Kolhe
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir 29July, 18.20
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव: समन्यायी कायद्याखाली आपले पाणी जायकवाडीला गेलं. नुकतंच येवल्याच्या चाळीस गावांना देखील आपल्या दारणा धरणातील पाणी पिण्यासाठी आरक्षीत झालं. आज जर आपण पाण्यासाठी भांडलो नाही तर शेती बरोबर पर्यायाने कारखानदारी देखील अडचणीतील त्यामुळे पाट पाण्यासाठी संघर्षाची तयारी ठेवा असे आवाहन कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी पोहेगाव येथील संचालक मंडळ सत्कार समारंभात केले केले.
यावेळी कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव, साईनाथ रोहमारे, चंद्र पंढरी पतसंस्थेचे संस्थापक उत्तमराव औताडे, रामनाथ चिने, आप्पासाहेब दवंगे, विश्र्वास महाले, बाळासाहेब वक्ते, ज्ञानेश्वर होन, बापूसाहेब बाराहाते, रमेश आभाळे, ज्ञानदेव औताडे, राजेंद्र कोळपे, मनिष गाडे, विलास वाबळे ,विलास माळी, सतीश आव्हाड, निवृत्ती बनकर, त्रिंबक सरोदे, सौ उषाताई औताडे,सौ सोनिया पानगव्हाणे, बापूसाहेब औताडे, संजय औताडे, माजी संचालक अशोक औताडे आप्पासाहेब औताडे, निखिल औताडे, शंकर औताडे, कचेश्वर रांधव, निवृत्ती औताडे ,अमोल औताडे ,अजित नवले ,काकासाहेब शिंदे, जगन्नाथ औताडे, नवनाथ औताडे ,सुखदेव भालेराव, इंद्रभान खुरसणे, रमेश रोहमारे, विलास रोहमारे आदी उपस्थित होते.
बाळासाहेब वक्ते म्हणाले, धरणे शंभर टक्के भरलेले असताना देखील तीनच आवर्तने झाली ही दुर्दैवी बाब आहे. आता जायकवाडी धरण भरले जरी असली तरी भविष्यासाठी संघर्ष हा अटळ आहे असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाचे नियोजन ज्ञानदेव पाराजी औताडे व सौ उषाताई संजय औताडे यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक डी पी औताडे यांनी केले तर आभार अशोक औताडे यांनी मानले.