विमानतळाचे गाव काकडीकडे आमदारांचे दुर्लक्ष अंतर्गत रस्त्यांची वाट लागली

विमानतळाचे गाव काकडीकडे आमदारांचे दुर्लक्ष अंतर्गत रस्त्यांची वाट लागली

Airport village Kakadi is waiting for roads under the neglect of MLAs

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir 29July, 18.30
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : आधीच गेल्या अडीच वर्षापासून विकासाच्या बाबतीत आमदार आशुतोष काळे यांचे दुर्लक्ष असलेल्या विमानतळाचे गाव काकडी येथील अंतर्गत रस्त्यांची पावसामुळे वाट लागली आहे, त्यामुळे अबाल वृद्ध विद्यार्थी यांना रस्त्यावरून ये जा करणे मुश्किल झाले असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य विजयराव डांगे व सर्व सदस्यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.

दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात आमदार काळे मतदारसंघासाठी एक हजार कोटी आणले काकडीच्या विकासासाठी दोनशे कोटी आणले अशा वल्गना केल्या जातात मात्र प्रत्यक्षात विकासाच्या नावाने बोंबाबोंब आहे, काकडी अंतर्गत मनेगांव मधला रस्ता, रांजणगांव ऐलमामे वस्ती मल्हारवाडी रस्ता, काकडी गुंजाळ वस्ती रस्ता, वाघ रस्ता, मल्हारवाडी वेस रस्ता आदि रस्त्यांची पावसाने वाट लागली आहे, या रस्त्यांना मोठ मोठे खडडे पडलेले आहे. सध्या शाळा महाविद्यालये सुरू झालेले आहे. विद्यार्थ्यांना याच रस्त्याने शाळेत ये जा करावी लागते पण हे रस्ते चिखलाने माखल्यांने त्यातुन अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तेंव्हा आमदार आशुतोष काळे यांनी हे रस्ते तातडीने दुरूस्त करावेत अशी मागणी ग्रामपंचायत सरपंच पुर्वा गुंजाळ, उपसरपंच भाउसाहेब सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय गुंजाळ, बाळासाहेब मोरे, उषाताई बाबासाहेब सोनवणे, हिराताई इंद्रभान गुंजाळ, सुनिता बाजीराव सोनवणे, यांच्यासह स्थानिक रहिवासीयांनी केली आहे तेंव्हा संबंधीत यंत्रणेने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा याविरूध्द नाईलाजास्तव उपोषणाचा मार्ग पत्करावा लागेल असेही सर्व सदस्यांनी शेवटी म्हटले आहे.

चौकट

शिर्डी विमानतळ प्राधिकरणाकडे काकडी ग्रामपंचायतीच्या कराची सुमारे सहा कोटी रूपयांची थकबाकी अद्यापही मिळालेली नाही. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद अंतर्गत दोनच शाळा खोल्यांची कामे चालु आहे ती पुरेशी नाही.

Leave a Reply

You cannot copy content of this page