माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची संजीवनी उद्योग समुहास भेट
Former Power Minister Chandrasekhar Bawankule’s visit to Sanjeevani Udyog Group
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 30July, 18.00
By
राजेंद्र सालकर
कोपरगांव : राज्याचे माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरूवारी संजीवनी उद्योग समुहास भेट दिली. सहकारात स्व. शंकरराव कोल्हे यांनी केलेले कार्य अनेक छोटया मोठया कार्यकर्त्यांना सतत उर्जा देत राहील असे आदरांजली वाहतांना ते म्हणाले.
अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, साईबाबा संस्थानचे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, भाजपचे शिर्डी लोकसभा मतदार संघाचे निरीक्षक सुनील कर्जतकर, साई संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे यांचा सत्कार केला. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव मतदार संघासाठी २२० क्षमतेचे वीज उपकेंद्र, यासह प्रलंबित उर्जाविषयक समस्या सोडवितांना माजीमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोलाची भूमिका बजावत कोटयावधी रूपयांची जनहिताची कामे केली असल्याचे सुतोवाच केले. विवेक कोल्हे यांनी कोल्हे कारखान्याने देशात प्रथमच ज्यूस टू इथेनॉल प्रकल्प कार्यान्वित करून यंदाच्या हंगामात उसाचे विक्रमी ऐतिहासिक गाळप केले असून औषधी पॅरासिटामोल प्रकल्प उभारणी सुरू असल्याचे सांगितले.
माजीमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अध्यक्ष विवेक कोल्हे यांचे अभिनंदन करून अध्यक्षासह सर्व नवनिर्वाचक संचालकांचा सत्कार केला.
याप्रसंगी उपाध्यक्ष रमेश घोडेराव, संचालक ज्ञानेश्वर भगवंत परजणे, विश्वासराव नारायणराव महाले, बापूसाहेब संपतराव बारहाते, निलेश पथाजी देवकर, बाळासाहेब चंद्रभान वक्ते, रमेश रंगनाथ आभाळे, ज्ञानदेव पाराजी औताडे, आप्पासाहेब रभाजी दवंगे, राजेंद्र निवृत्ती कोळपे, ज्ञानेश्वर चिलीया होन, मनेष दिनकर गाडे, विलास एकनाथ वाबळे, विलास तुळशीराम माळी, त्रंबकराव निवृत्ती सरोदे, सौ उषा संजय औताडे, सौ. सोनिया बाळासाहेब पानगव्हाणे, निवृत्ती कारभारी बनकर, सतिष सुभाषराव आव्हाड यांच्यासह कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, चीफ केमिस्ट विवेककुमार शुक्ला, चीफ इंजिनियर के. के. शाक्य, साखर सर व्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजर प्रकाश डुंबरे, एच. आर. मॅनेजर प्रदीप गुरव, विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, खाते प्रमुख, उपस्थित होते. शेवटी उपाध्यक्ष रमेश घोडेराव यांनी आभार मानले.