विरोधकांचे मनसुबे उधळल्याने त्यांची पोटदुखी – सुनिल गंगुले

विरोधकांचे मनसुबे उधळल्याने त्यांची पोटदुखी – सुनिल गंगुले

His stomach ache as the plans of the opponents were foiled – Sunil Gangule

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 30July, 18.40
By
राजेंद्र सालकर

 कोपरगाव : भाजप तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांच्या आरोपाचा समाचार घेताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी ५ नं. साठवण तलाव होवू नये व शहराचा पाणी प्रश्न सुटू नये हे विरोधकांचे मनसुबे तलावाचे काम सुरु झाल्यामुळे उधळले गेल्याने विरोधकांची पोटदुखी वाढली असल्याची जोरदार टीका त्यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.

२०१९ पासून कालवा सल्लागार समितीच्या बैठकी मतदार संघात होवू लागल्या व बैठकीत ठरल्याप्रमाणे प्रमाणे आवर्तन दिले जात असल्याने शेतकऱ्याची कुठलीही तक्रार नाही. याउलट २०१४ ते २०१९ या पाच वर्षात माजी आमदारांनी कालवा सल्लागार समितीची बैठक मुंबईला नेल्यामुळे लाभधारक शेतकऱ्यांना आपल्या अडचणी मांडता येत नव्हत्या. त्याबाबत देखील विरोधकांनी बोलले पाहिजे. असे गंगुले यांनी म्हटले आहे. ना. आशुतोष काळे यांनी सत्ता नसताना देखील ५ नं. साठवण तलावाची आग्रही भूमिका लावून धरली व प्रत्यक्षात पाच नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी निधी आणून प्रत्यक्षात या योजनेचे काम सुरु केले आहे. लवकरच साठवण तलावाचे काम पूर्ण होऊन सर्व शहरवासीयांना नियमितपणे मुबलक पाणी मिळणार आहे यामुळे निवडणुकीत आपले मताधिक् घटणार असल्याची खरी धास्ती विरोधकांनी घेतली असून शेतकऱ्यांच्या आडून न्यायालयात याचिका दाखल केले आहेत. तलावाचे काम करू नये म्हणून कंपनीवर दबाव आणला. सिंचनाचे पाणी कमी होणार असल्याचा संभ्रम शेतकऱ्यात निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सिंचनाच्या पाण्याला धक्का न लावता नामदार काळे यांनी कोपरगाव शहरासाठी अतिरिक्त ३.३२ द.ल.घ.मी. पाणी मंजूर करून घेतले आहे. त्यामुळे विरोधकांचे आरोप हे बिनबुडाचे आहेत. ज्यांना काही काम नाही ते मात्र फक्त टीका करीत असल्याचा टोला गंगुले यांनी रोहोम यांना पत्रकातून लगावला आहे.

चौकट :

५ नं. साठवण तलाव हा ना. आशुतोष काळेंचा ड्रीम प्रोजेक्ट आहे त्यामुळे विरोधक कितीही आडवे आले तरी साठवण तलाव ते पूर्ण करणार आहेत – सुनील गंगुले

Leave a Reply

You cannot copy content of this page