रोटरी क्लबकडून खडकी झेडपीच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंची वाटप

 रोटरी क्लबकडून खडकी झेडपीच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंची वाटप

Distribution of school supplies to school students of Khadki ZP by Rotary Club

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 30July, 18.50
By
राजेंद्र सालकर

 कोपरगांव: कोपरगांव शहराच्या खडकी या उपनगरामध्ये जिल्हा परीषदेची शाळा  असुन तेथे सुमारे २२५ विद्यार्थी शिक्षण  घेत अहेत. ते सर्व गरीब कुटूंबातील आहेत.  ही सर्व चिमुरडी बालक अभ्यासाचे धडे गिरवित आहेत. कधी पाटी नाही, कधी वही नाही तर कधी पेन्सिल आणि दप्तरही नाही. अशा  परीस्थितीत रोटरी क्लबने सर्व विद्यार्थ्यांना  शालेय साहित्याचे वाटप केले आणि सर्व बालकांच्या चेहऱ्यावर  हास्य फुलले.

रोटरी क्लब ऑफ  कोपरगांव सेंट्रलच्या पुढाकाराने अनेक विधायक उपक्रम राबविले जातात. त्यामुळे अनेकांना मदतीचा हात मिळत आहे. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ चे गव्हर्नर रूखमेश जखोटीया यांनी एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. त्यांच्या या संकल्पनेला हातभार लावण्यासाठी सदर प्रसंगी क्लबच्या वतीने वृक्ष लागवडही करण्यात आली.      

 सदर प्रसंगी रोटरी क्लबचे विरेश  अग्रवाल, राकेश  काले, रोहित वाघ, विशाल  आढाव, विनोद मालकर, इमरान सय्यद, सनी अव्हाड तसेच मुख्याध्यापक दत्तात्रय काळे, श्रीराम तांबे, आदी उपस्थित होते. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. 

Leave a Reply

You cannot copy content of this page